दीपिकाची बॉलिवूडमध्ये १५ वर्षे, २८ ब्रॅंड्सची अँबेसिडर आणि बरंच काही....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 03:54 PM2022-11-09T15:54:22+5:302022-11-09T16:28:44+5:30

१५ वर्षांपूर्वी शाहरुख खानचा ओम शांती ओम रिलीज झाला आणि एक सुंदर अभिनेत्री सर्वांच्या नजरेत आली. तिची जितकी उंची जास्त आहे तितकीच तिच्या अभिनयाची जादूही. गालावर खळी आणि आपल्या गोड हास्याने सगळ्यांनाच भुरळ घालणारी ही अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. आखो मे तेरी या गाण्यातुन तिने आपली जादू दाखवली. पण दीपिकाचा ओम शांती ओम हा पहिला सिनेमा नव्हता. दीपिकाने कन्नड सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. दीपिकाबद्दल माहित नसलेल्या आणखी काही गोष्टी जाणून घेऊया

दीपिकाचा पहिला चित्रपट हा ओम शांती ओम नसून 'ऐश्वर्या' हा होता. २००६ साली दिग्दर्शक इंद्रजीत लंकेश यांच्या कन्नड सिनेमातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यापूर्वी दीपिका म्युझिक व्हिडीओ मध्ये झळकली होती. संगीतकार हिमेश रेशमिया च्या नाम है तेरा या अल्बम मध्ये तिने काम केले.

दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण हे बॅडमिंटन चॅम्पियन आहेत. पण दीपिकाही राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन खेळली आहे. पी व्ही सिंधू सोबत नुकतेच तिने बॅडमिंटनची प्रॅक्टिस केली ते व्हीडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

दीपिका तिच्या करिअरमध्ये २७ हून जास्त ब्रॅंड्स ला एंडॉर्स करते. विशेष म्हणजे केवळ भारतीय नाही तर आंतरराष्ट्रीय ब्रॅंड्सनेही दीपिकाला अॅंबेसिडर म्हणून जाहीर केले आहे. त्यात नुकतेच जाहीर झालेल्या फ्रान्सच्या लुईस व्हुइटन या फॅशन ब्रॅंडची दीपिका पहिली भारतीय अॅंबेसिडर आहे.

अभिनय क्षेत्रात येण्यापुर्वी दीपिकाने मॉडेलिंग क्षेत्रात नाव कमावले होते. २००५ मध्ये तिने किंगफिशर मॉडेल ऑफ द इयर हे टायटल मिळवले. त्याच वर्षी तिने फॅशन क्षेत्रातही पदार्पण केले. डिझायनर सुमीत वर्मा यांच्यासाठी लॅक्मे फॅशन वीक मध्ये रॅम्प वॉक केला.