आज करोडोच्या लक्झरी कारमधून फिरणाऱ्या ‘या’ स्टार्सनी कोणती घेतली होती पहिली कार ? पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 05:59 PM 2022-07-27T17:59:03+5:30 2022-07-27T18:23:37+5:30
Celebrities And Their First Car : आज बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कोट्यवधी रूपयांच्या कारमध्ये फिरतात. पण यापैकी काही स्टार मंडळींची पहिली कार कोणती होती माहितीये? चाहते ज्यांना देव मानतात ते साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या ताफ्यात आज अनेक महागड्या गाड्या आहेत. पण त्यांची पहिली कार प्रीमियम पद्मिनी होती. जी आजही चांगल्या कंडिशनमध्ये आहे. त्यांनी ती जपून ठेवली आहे.
बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान आज लक्झरी गाड्यांमधून फिरतो. पण त्याची पहिली कार त्याला भेट म्हणून मिळाली होती. होय, त्याच्या आईने त्याला मारूती ओमनी ही पहिली कार गिफ्ट म्हणून दिली होती.
बॉलिवूड सुपरस्टार काजोलची पहिली कार होती मारूती 1000. ही कार त्यावेळी देशातील अलिशान कारपैकी एक होती. ग्रे कलरच्या या कारमधून काजोल सेटवर यायची.
दीपिका पादुकोण आजघडीला कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. दीपिकाने ऑडी क्यू 7 ही पहिली कार खरेदी केली होती. पहिला सिनेमा ‘ओम शांती ओम’ रिलीज झाल्यानंतर तिने ही ब्लॅक कलरची कार खरेदी केली होती.
प्रियंका चोप्राने मर्सिडीज बेंज एस -क्लास ही पहिली कार खरेदी केली. ही कार तेव्हा सेलिब्रिटींमध्ये चांगलीच लोकप्रिय होती. आता प्रियंकाकडे अनेक अलिशान गाड्या आहेत.
आलिया भट आज बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. इंडस्ट्रीमध्ये गेल्या दशकापासून असलेल्या आलियाने ऑडी क्यू 7 लक्झरी एसयुव्ही ही पहिली कार खरेदी केली होती.
श्रद्धा कपूर ही लो प्रोफाईल अभिनेत्रींपैकी एक आहे. कारण ती आपल्या वैयक्तिक गोष्टी खासजी ठेवण्याचा प्रयत्न करते. श्रद्धा कपूरची पहिली कार होती मर्सिडीज बेंज एमएल क्लास.
सारा अली खान हिने खरेदी केलेली पहिली कार होती होंडा सीआर व्ही. या एसयुव्हीने एकेकाळी भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला होता. ही गाडी साराने तिच्यासाठी निवडली होती.
कंगना राणौतने तिच्या फिल्मी करिअरमध्ये बराच संघर्ष केला. काही वर्ष स्ट्रगल केल्यानंतर अखेर तिने बीएमडब्ल्यू 7 सीरिज ही पहिली कार खरेदी केली होती.
बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक इम्तियाज अलीची पहिली कारही मारुती 800 होती. आज मात्र त्याच्या कलेक्शनमध्येही महागड्या आणि अलिशान कार दिसतात. काही दिवसांपूर्वीच इम्तियाज अलीने आपल्या पहिल्या कारसोबतचा फोटो शेअर केला होता.