'छपाक'च्या इव्हेंटमध्ये दिसला दीपिका पदुकोणचा 'कातिल' अंदाज, फोटो पाहून व्हाल क्लिन बोल्ड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 11:17 IST2020-01-03T10:07:46+5:302020-01-03T11:17:58+5:30

दीपिका पदुकोण ही ‘छपाक’ या मूवीच्या प्रमोशनसाठी जुहू येथील हॉटेल 'J W Marriot' मध्ये उपस्थित होती
2005 मध्ये एकतर्फी प्रेम करणा-या एका मुलाने लक्ष्मीवर अॅसिड हल्ला केला होता. या हल्ल्यात लक्ष्मीचा चेहरा पूर्णत: बिघडला होता. पण लक्ष्मी खचली नाही. तिने कायदेशीर लढाई लढली. तिच्या बुलंद इराद्यामुळे छोट्या दुकानांमध्ये अॅसिडच्या विक्रीबद्दल कठोर कायदा बनला.
अॅसिड हल्ल्यातून सावरून जिद्दीने आयुष्य उभ्या करणा-या लक्ष्मी अग्रवालची कहाणी सांगणारा ‘छपाक’ हा सिनेमा आहे
‘छपाक’ हा सिनेमा येत्या 10 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय
‘छपाक’ या सिनेमात 'दीपिका पदुकोण' हि लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारणार आहे
दीपिका पदुकोण सोबत विक्रांत मसे या चित्रपटात आपल्यलाल पाहायला मिळणार आहे
विक्रांत मसे या सिनेमात अमोल ची भूमिका साकारणार आहे
अमोल हा लक्ष्मी अग्रवाल चा बॉयफ्रेन्ड आहे
दीपिका पदुकोण या ब्लॅक जॅकेट मध्ये हटके दिसत होती
नवीन वर्षातील दीपिकाचा पहिलाच सिनेमा ‘छपाक’ हा तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असणार आहे