देशमुखांची सूनबाई जिनिलिया जेवण बनवताना करत नाही तेलाचा वापर, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:31 PM 2023-02-04T12:31:54+5:30 2023-02-04T12:37:40+5:30
Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांच्या लग्नाला नुकतेच ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांच्या लग्नाला नुकतेच ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.
जिनिलिया आणि रितेश नुकतेच वेड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे.
वेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जगभरातून ७० कोटींहून जास्त कमाई केली आहे.
जिनिलिया मराठमोळ्या संस्कृतीच्या प्रेमात आहे आणि तिला महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात.
जिनिलियाला पिठलं भाकर हा पदार्थ खूप आवडतो. तिने सांगितले होते की, “मला पिठलं, भाकरी व ठेचा खूप आवडतो. आई (सासूबाई) दर गुरुवारी पिठलं, भाकरी आणि ठेचा़ बनवतात.”
जिनिलिया स्वतःच्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देते. महाराष्ट्रीयन पदार्थ आरोग्यासाठी अधिक उत्तम असतात हे मी अनुभवल्याचे ती आवर्जून सांगते.
पिठल्यामध्येही प्रोटीन आहे. मी जेव्हा जेवण बनवते तेव्हा मी तेल वापरत नाही. शेंगदाण्याच्या कुटामध्ये मी जेवण बनवते. कारण त्यामध्येच तेल असतं. मला पुरणपोळी तर खूपच जास्त आवडते.
जिनिलिया देशमुख अस्सल मराठमोळे पदार्थ खाते. त्याबरोबरीने ती घरातही विविध पदार्थ बनवते.