devara actress janhvi kapoor look beautiful in saree see photos
'धीरे-धीरे छू के मेरे मन को रे तू ..." साडीत खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य, हटणार नाही नजर By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 04:45 PM2024-09-23T16:45:51+5:302024-09-23T16:53:02+5:30Join usJoin usNext जान्हवीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती देवरा सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व्यस्त असल्याचं दिसून आहे. देवरा सिनेमात ती ज्युनिअर एनटीआर सोबत झळकणार आहे. जान्हवीकडे पाहिल्याने तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येते. श्रीदेवी यांच्याप्रमाणेच जान्हवीदेखील आता दाक्षिणात्य सिनेमात काम करत चाहत्यांचे मन जिंकून घेत आहे. नुकतंच जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या सुंदर साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे. जान्हवी कपूरने कातील अदांनी चाहत्यांना तर अक्षरश: वेडच लावले आहे. यावेळी जान्हवीने निळ्या रंगाला साजेसे असे झुमके कॅरी केले. त्यानं तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली होती. या लुकसाठी जान्हवीने ग्लासी मेकअप केला होता. या लुकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसतेय. जान्हवीने डीपनेक ब्लाऊज कॅरी केले आहे. केस बांधल्याने तिच्या लुकमध्ये अजूनच भर टाकली आहे. दाक्षिणात्य लूकमधील तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. टॅग्स :जान्हवी कपूरसेलिब्रिटीJanhavi KapoorCelebrity