Arbaaz Khan Giorgia Andriani : अरबाजचं मलायकानंतर जॉर्जियासोबतही बिनसलं...? गर्लफ्रेन्ड काय म्हणाली पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 03:48 PM 2022-11-29T15:48:08+5:30 2022-11-29T16:03:47+5:30
Arbaaz Khan Giorgia Andriani : होय, अरबाज व जॉर्जिया यांच्यात बिनसल्याची चर्चा जोरात आहे आणि या चर्चेला कारण आहे जॉर्जियाची ताजी मुलाखत. होय, जॉर्जिया बोलता बोलता असं काही बोलून गेली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. अभिनेता अरबाज खान व मलायका अरोरा यांचं नातं मे 2017मध्ये संपलं. 19 वर्षे एकत्र संसार केल्यावर एका वळणावर अचानक अरबाज व मलायकानं एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दोघंही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत.
एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबत खुश्श आहे तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. पण आता कदाचित दोघांचं ब्रेकअप झालं आहे.
होय, अरबाज व जॉर्जिया यांच्यात बिनसल्याची चर्चा जोरात आहे आणि या चर्चेला कारण आहे जॉर्जियाची ताजी मुलाखत. होय, जॉर्जिया बोलता बोलता असं काही बोलून गेली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.
‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत जॉर्जियाने अरबाजला चांगला मित्र संबोधलं. होय, अरबाजला बॉयफ्रेन्ड न म्हणता तिने तो फक्त माझा चांगला मित्र असल्याचं सांगितलं.
मुलाखतीत जॉर्जियाला तिच्या आणि अरबाजच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला गेला. यावर, खरंच आमचा लग्नाचा काहीही प्लान नसल्याचं तिने स्पष्ट केलं.
अरबाज माझा खूप चांगला मित्र आहे. पण आमचा लग्नाचा कोणताच विचार नाही. लॉकडाऊननंतर आमचं नातं फार बदललं आहे, असंही ती म्हणाली.
लग्नाबद्दल आमचा काहीही विचार नाही. लॉकडाऊनने आम्हाला असा विचार करायला भाग पाडलं. लॉकडाऊनमुळे एकतर लोक एकमेकांच्या जवळ आले किंवा लॉकडाऊनने लोकांना दूर केलं, असं ती म्हणाली.
जॉर्जिया ज्यापद्धतीने बोलली त्यावरून दोघांत काही बिनसल्याची चर्चा सुरू झाली आहे. कदाचित आता जॉर्जिया व अरबाज दोघं फक्त चांगले मित्र आहेत. यापेक्षा त्यांच्यात काहीही नाही.
अरबाज आणि जॉर्जिया यांच्या वयात जवळपास 22 वर्षांचं अंतर आहे. अरबाज खान 55 वर्षांचा आहे. तर जॉर्जिया 33 वर्षांची आहे. दोघांच्या वयातील अंतरामुळे अनेकदा त्यांना ट्रोल केलं गेलं आहे.
जॉर्जियाचं नाव फॅशन जगतात खूप मोठं नाव आहे. तिने 30 हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचं नाव आहे.