सातच महिन्यांत शमिता शेट्टी व राकेश बापटचं ब्रेकअप? जाणून घ्या काय आहे सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 05:36 PM 2022-03-10T17:36:35+5:30 2022-03-10T17:46:06+5:30
hamita Shetty- Raqesh Bapat : शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या नात्याबद्दल सध्या वेगळ्याच चर्चा सुरू आहेत. या दोघांचं नातं आता ब्रेकअपच्या उंबरठ्यावर उभं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये शमिता शेट्टी व राकेश बापट यांचं प्रेम फुललं होतं. शो संपला, तसं हे प्रेमही संपेल, असं सगळ्यांना वाटलं होतं. पण शोनंतरही शमिता व राकेश सोबत दिसले.
पण कालपरवापासून शमिता व राकेश यांच्यात काहीतरी बिनसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अगदी दोघांचं ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या उमटल्या.
उण्यापुºया सातच महिन्यात शमिता व राकेशनं वेगळा निर्णय घेतल्याचा दावा अनेक रिपोर्टमध्ये करण्यात आला. साहजिकच चाहत्यांनाही धक्का बसला.
आता या ब्रेकअपच्या बातम्यांवर खुद्द शमिताने खुलासा केला आहे. खरं तर तिच्या व राकेशच्या ब्रेकअपच्या बातम्या वाचून शमिता चांगलीच संतापली आहे.
इन्स्टास्टोरी शेअर करत तिच्या व राकेशच्या ब्रेकअपच्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचं शमिताने म्हटलं आहे. तुम्हाला विनंतीआहे की, आमच्या नात्याबद्दलच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेऊ नका. यात काहीही सत्य नाही, असं तिने इन्स्टास्टोरीत लिहिलं आहे.
राकेशआधी आफताब शिवदासानी,उदय चोप्रा, हरमन बावेजा अशा अनेकांशी तिचं नाव जोडलं गेलं होतं. पण यापैकी कोणत्याच नात्यावर शमिता कधी बोलली नाही.
राकेश बापट हा घटस्फोटीत आहे. टीव्ही अभिनेत्री रिद्धी डोग्रासोबत त्याचं लग्न झालं होतं. पण लग्नाच्या 8 वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2019 साली दोघं घटस्फोट घेत वेगळे झालेत.