Thalapathy Vijay: 23 वर्षांचा संसार मोडणार! साऊथ सुपरस्टार थलपती विजय पत्नी संगीताला देणार घटस्फोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 10:54 AM2023-01-06T10:54:43+5:302023-01-06T11:04:21+5:30

Thalapathy Vijay: साऊथ इंडस्ट्रीतलं आणखी एक जोडपं होणार विभक्त? जाणून घ्या सत्य

जोसेफ विजय चंद्रशेखरला फॅन्स थलपती विजय नावानं ओळखतात. थलपती विजय म्हणजे तामिळ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार. सध्या तो चर्चेत आहे तो घटस्फोटाच्या बातम्यांमुळे.

होय, थलपती विजय लग्नाच्या 23 वर्षानंतर पत्नीला घटस्फोट देत असल्याच्या चर्चा आहेत. दोघांना जेसन व दिव्या अशी दोन मुलं आहेत.

अद्याप थलपती विजय व त्याची पत्नी संगीता यांच्याकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती नाही. पण गेल्या काही महिन्यांपासून दोघं वेगवेगळे राहत असल्याचं म्हटलं जात आहे.

थलपती विजय व संगीता दोघांनी आपसी सहमतीने घटस्फोटाचा निर्णय घेतल्याचा दावा रिपोर्टमध्ये केला जात आहे.

याआधी थलपती विजयच्या प्रत्येक सिनेमाच्या प्रमोशनमध्ये संगीता असायची. मात्र गेल्या काही दिवसांत दोघंही एकत्र दिसलेले नाहीत.

काही दिवसांपूर्वी एटलीची पत्नी प्रियाचा बेबी शॉवर होता. या कार्यक्रमालाही विजय एकटाच पोहोचला होता. सध्या थलपती ‘वरिसू’ या सिनेमाचं प्रमोशन करतोय. याच्या म्युझिक लॉन्च इव्हेंटमधूनही संगीता गायब होती.

अर्थात पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या घटस्फोटाच्या बातम्या अफवा आहेत. संगीता मुलांसोबत युएसमध्ये सुट्टीवर गेली आहे. त्यामुळे ती ‘वरिसू’च्या प्रमोशन इव्हेंटमध्ये दिसली नाही.

विजयने त्याच्या एका फिमेल फॅनसोबत लग्न केलं. तिचं नाव संगीता सोरनालिंगम. ती श्रीलंकेतील एका उद्योगपतीची लाडकी लेक आणि विजयची खूप मोठी फॅन होती. एक दिवस ती आपल्या लाडक्या स्टारला म्हणजे विजयला भेटायला आली आणि तो स्टार तिच्याच प्रेमात पडला.

विजय त्याच्या एका चित्रपटाच्या शूटींगसाठी चेन्नईला गेला होता. विजय त्यावेळी फार काही मोठा स्टार नव्हता. पण तरिही शूटींगस्थळी चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेकजण विजयला भेटायला उत्सुक होते. संगीता नावाची एक फिमेल फॅन सुद्धा या गर्दीत होती.

ती त्याला भेटण्यासाठी खास लंडनमधून भारतात आली होती. ती विजयला भेटली आणि तिने त्याला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्यात. ही मुलगी इतक्या लांबून आपल्याला भेटायला आली, हे ऐकून विजय चांगलाच इम्प्रेस झाला.

त्याने थेट संगीताला संध्याकाळी घरी येण्याचं निमंत्रण दिलं. इथून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे विजय आपल्या या फिमेल फॅनच्या प्रेमात कधी पडला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही. 25 आॅगस्ट 1999 रोजी विजयने संगीतासोबत लग्नगाठ बांधली.