'कल हो ना हो'मध्ये शाहरुखसोबत झळकलेली चिमुकली आता काय करते? आईदेखील आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 11:36 AM2021-09-30T11:36:33+5:302021-09-30T11:44:16+5:30

Jhanak shukla: हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १७-१८ वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अजूनही त्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

शाहरुख खान, प्रिती झिंटा आणि सैफ अली खान यांचा कल हो ना हो हा चित्रपट प्रत्येक प्रेक्षकाच्या स्मरणात असेल. अनेक हिट चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा आवर्जुन उल्लेख केला जातो. त्यामुळेच आजही या चित्रपटाची लोकप्रियता यत्किंचितही कमी झालेली नाही.

हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास १७-१८ वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अजूनही त्याची जादू प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.

शाहरुख, प्रिती आणि सैफ यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटातील आणखी एक भूमिका गाजली ती जिया कपूरची. ही भूमिका बालकलाकार झनक शुक्लाने साकारली होती.

'कल हो ना हो'मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या झनकने ९० च्या दशकात अनेक मालिका, जाहिरातींमध्ये काम केलं आहे.

'करिश्मा का करिश्मा' या मालिकेत तिने एका रोबोटची भूमिका साकारली होती.

एकेकाळी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये झळकलेली झनक कलाविश्वातून एकाएकी गायब झाली आहे. त्यामुळेच ही चिमुकली नेमकं काय करते असा प्रश्न अनेकांना पडतो.

कल हो ना हो मध्ये झळकलेली झनक आता मोठी झाली असून ती ऑर्कियॉलॉजिस्ट असल्याचं म्हटलं जातं.

झनकचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, संधी मिळाल्यावर पुन्हा एकदा कलाविश्वात येणार असल्याचं तिने म्हटलं आहे.

झनकप्रमाणेच तिची आईदेखील हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून त्या अजूनही या क्षेत्रात सक्रीय आहेत.

झनकच्या आईचं नाव सुप्रिया शुक्ला असून त्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.

कुंडली भाग्य या मालिकेत त्यांनी सरला अरोरा ही भूमिका साकारली होती.