बॉलिवूड सेलिब्रेटींनी सुरू केलाय DilSeThankYou हा हॅशटॅग, यामागे आहे हे खूप चांगले कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 07:00 IST2020-04-11T07:00:00+5:302020-04-11T07:00:02+5:30

सध्या भारतात कोरोनाने थैमान घातले असून 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण त्याही मध्ये पोलिस कर्मचारी, डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, सफाई कामगार तसेच अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. अक्षय कुमारने दिल से थँक यू असे म्हणत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच इतर सेलिब्रेटींना देखील या लोकांना दिल से थँक यू म्हणण्याचे आवाहन केले आहे.
अक्षयच्या या आवाहानानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी दिल से थँक यू म्हणत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. शिल्पा शेट्टीने त्यांना सॅल्यूट करतानाचा तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
बिपाशा बासूने देखील सगळ्यांचे आभार मानले आहेत
सोनाक्षी सिन्हाने एका पुस्तकावर दिल से थँक यू असे लिहित आभार मानले आहेत.
डायना पेन्टी
मॉनी रॉय
मनिष पॉल
करिश्मा कपूर