सलमानसोबत 'जुड़वा'मध्ये झळकलेली ही अभिनेत्री आठवतेय का?, आहे तीन मुलांची आई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 03:30 PM2024-07-26T15:30:43+5:302024-07-26T15:37:27+5:30

Actress Rambha : सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रंभा आठवते का? जिने लग्नानंतर कलाविश्वाला रामराम केला. भलेही आता ती बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी इतक्या वर्षांनंतरही तिच्या सौंदर्याची चर्चा आहे.

सलमान खानसोबत 'जुडवा' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री रंभा आठवते का? जिने लग्नानंतर कलाविश्वाला रामराम केला. भलेही आता ती बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी इतक्या वर्षांनंतरही तिच्या सौंदर्याची चर्चा आहे.

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंभाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

रंभाने केवळ बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलं नाही तर ती दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री देखील आहे.

सलमान खानसोबत 'बंधन' आणि 'जुडवा' सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रंभाने लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीला अलविदा केला.

आता ९० च्या दशकातील क्रश मानली जाणारी रंभा जरी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

अशा परिस्थितीत या ४८ वर्षीय अभिनेत्री आजही लोकांची मने जिंकते. इतकेच नाही तर ३ मुलांची आई होऊनही ती खूपच तरुण दिसते.

२०१० मध्ये कॅनडास्थित उद्योगपती इंद्रकुमार पथमनाथन यांच्याशी लग्न केल्यानंतर रंभा त्याच्यासोबत कॅनडाला शिफ्ट झाली.

आता तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ज्यांच्यासोबत ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते.

रंभाचा फिटनेस आणि ग्लॅमरस लूक पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येत नाही.