Doctor's Day: Sai Pallavi to Manushi Chhillar 'These' Filmstars Have Medical Degrees
Doctor's Day : साई पल्लवी ते मानुषी छिल्लरपर्यंत... 'या' फिल्मस्टार्सकडे आहे वैद्यकीय पदवी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 05:07 PM2024-07-01T17:07:55+5:302024-07-01T17:10:22+5:30Join usJoin usNext राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी 1 जुलै रोजी हा डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. वैद्यकीय अभ्यास हा सर्वात कठीण अभ्यासांपैकी एक मानला जातो. अशा स्थितीत ही पदवी मिळवल्यानंतरही वैद्यकशास्त्राचा मार्ग सोडून अन्य कोणत्यातरी क्षेत्रात जाण्याचा निर्णय कुणासाठी सोपा नाही. असे अनेक सिनेस्टार आहेत. ज्यांनी मोठ्या पडद्यावर डॉक्टरची भुमिका साकारली. पण, फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे काही स्टार आहेत, जे खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहेत. आज राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्ताने आपण अशा सेलिब्रिटींबद्दल जाणून घेऊया ज्यांनी डॉक्टर होण्यासाठी शिक्षण घेतलं, पण त्यांनी फिल्मी दुनियेत येण्याचा निर्णय घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू हे अभिनयात येण्यापूर्वी डॉक्टर होते. ते प्रशिक्षित ईएनटी सर्जन होते. 1960 च्या दशकात त्यांनी भारत आणि टांझानियामध्ये औषध आणि शस्त्रक्रियेचा सराव केला. डॉक्टर झाले तरी त्यांचं मन मात्र अभिनयातच राहिलं. अखेर त्यांनी डॉक्टर पेशा सोडला आणि फिल्मी इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. साउथ अभिनेत्री साई पल्लवी तिच्या सौंदर्यासाठी, दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. साई पल्लवीकडे मेडिकलची डिग्रीदेखील आहे. २०१५ मध्ये साई पल्लवीने प्रेमम या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मात्र त्यावेळी ती एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. या यशाची हवा डोक्यात जाऊ न देता साईने आपले राहीलेले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले. दे दना दन, सोच आणि भेजा फ्राय 2 सारख्या चित्रपटात झळकलेली अभिनेेत्री आदिती गोवित्रीकर खऱ्या आयुष्यातही डॉक्टर आहे. तिनं मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर मानसशास्त्रात पदव्युत्तर आणि नंतर समुपदेशनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. ती फिजिशियनही राहिली आहे. 'मिस वर्ल्ड' मानुषी छिल्लर देखील दंतचिकित्सक होणार होती. परंतु मॉडेलिंगमुळे तिने शिक्षण अर्धवट सोडलं. मानुषी सोनपतच्या भगत फूल सिंग मेडिकल कॉलेजमधून डेंटिस्टचे शिक्षण घेत होती. 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकल्यानंतर तिनं अक्षय कुमारसोबत सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली. दरम्यान अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्येही मानुषी महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. सुप्रसिद्ध अँकर, गायक आणि अभिनेता मियांग चेंग दंतचिकित्सक आहे. त्यानं व्हीएस डेंटल कॉलेजमधून दंतचिकित्साचे शिक्षण घेतले आणि बीडीएस (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) ची पदवी प्राप्त केली. अभिनेता शेवटचा 'असुर सीझन 2' मध्ये दिसला होता. सुप्रसिद्ध टीव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री आकांक्षा सिंगनेही वैद्यकीय क्षेत्र सोडून फिल्मी दुनियेत प्रवेश केला आहे. तिने फिजिओथेरपिस्टचे शिक्षण घेतले आहे. आकांक्षाला 'ना बोले तुम ना मैने कुछ कहा' या टीव्ही शोमधून लोकप्रियता मिळाली. 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मध्येही ती दिसली आहे. आज ती साऊथ चित्रपटसृष्टीत धुमाकूळ घालत आहे.टॅग्स :मानुषी छिल्लरसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाश्रीराम लागूसाई पल्लवीडॉक्टरManushi ChillarCelebritybollywoodcinemaShriram Lagoosai pallavidoctor