'डॉन' ते 'गली बॉय' रणबीर कपूरने नाकारलेले ८ ब्लॉकबस्टर सिनेमे, आज राहिला असता हिरो नंबर १.... By अमित इंगोले | Published: September 28, 2020 03:40 PM 2020-09-28T15:40:58+5:30 2020-09-28T16:05:01+5:30
शाहरूख खानच्या डॉनपासून सुरू होणारी ही लिस्ट गली बॉयपर्यंत येते. आज आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला त्याने नाकारलेले आणि ब्लॉकबस्टर ठरलेले सिनेमे सांगणार आहोत. रणबीर कपूर बॉलिवूडमधील असा कलाकार आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले. पण त्याने तेवढेच ब्लॉकबस्टर सिमेने नाकारले होते. शाहरूख खानच्या डॉनपासून सुरू होणारी ही लिस्ट गली बॉयपर्यंत येते. आज आम्ही त्याच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला त्याने नाकारलेले आणि ब्लॉकबस्टर ठरलेले सिनेमे सांगणार आहोत.
डॉन - असे सांगितले जाते की, फरहान अख्तर 'डॉन' मध्ये रणबीर कपूरला घेणार होता. पण त्यावेळी रणबीरला वाटलं होतं की, अॅक्शन सिनेमा करणं त्याच्या करिअरसाठी चांगलं राहणार नाही. ज्यामुळे त्याने हा सिनेमा नाकारला होता. नंतर या शाहरूख खानची एन्ट्री झाली.
बॅंड बाजा बारात - रणवीर सिंहचा डेब्यू सिनेमा 'बॅंड बाजा बारात' साठी पहिली चॉइस रणबीर कपूर होता. पण त्याने या सिनेमाला नकार दिला. एका मुलाखतीत रणबीर कपूरने सांगितले होते की, हा सिनेमा सोडण्याचा त्याला पश्चाताप आहे.
बॅंग-बॅंग - हृतिक रोशनचा शेवटचा ब्लॉकबस्टर सिनेमा बॅंग बॅंग हा सुद्धा रणबीर कपूरला ऑफर करण्यात आला होता. पण हा सुद्धा सिनेमा त्याने नाकारला कारण त्याला अॅक्शन सिनेमा करायचा नव्हता.
२ स्टेट्स - अर्जुन कपूर आणि आलिया भट्टचा २ स्टेट्स हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर १०४ कोटी रूपये कमाई केली होती. पण हा सुद्धा रणबीरने नाकारला होता.
दिलवाले - रोहित शेट्टीच्या 'दिलवाले' मध्ये वरूण धवनची भूमिका आधी रणबीर कपूरला ऑफर करण्यात आली होती. पण त्याने तो नाकारला.
दिल धड़कने दो - दिल धड़कने दो सिनेमात झोया अख्तर आधी रणबीर कपूर साइन करणार होती. पण रणबीरने हाही सिनेमा नाकारला.
गली बॉय - आलिया भट्ट आणि रणवीर सिंहच्या जोडीने या सिनेमातून बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. या सिनेमाने पहिल्याच दिवशी १९.४० कोटी रूपयांची कमाई केली होती.
तख्त - काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, रणबीर कपूरला 'तख्त' सिनेमा ऑफर करण्यात आला होता. पण त्याला मल्टीस्टारर सिनेमा करायचा नव्हता. ज्यामुळे त्याने हा सिनेमा नाकारला. यातील विकी कौशलची भूमिका रणबीरला दिली जाणार होती.