PICS : साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानची पत्नी अमाल दिसते फारच सुंदर, पाहा रोमॅन्टिक फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 04:58 PM 2022-09-04T16:58:32+5:30 2022-09-04T17:10:54+5:30
Dulquer Salmaan : मल्याळम सुपरस्टार दुलकर सलमानचे जगभर चाहते आहेत. दुलकरचा ‘सीता रामम’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे आणि सिनेमाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. पण सध्या दुलकरची नाही तर त्याच्या बायकोची चर्चा आहे. मल्याळम सुपरस्टार दुलकर सलमानचे जगभर चाहते आहेत. दुलकरचा ‘सीता रामम’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे आणि सिनेमाची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. पण सध्या दुलकरची नाही तर त्याच्या बायकोची चर्चा आहे.
होय, दुलकरची पत्नी अमाल सूफिया हिचा आज वाढदिवस. बायकोच्या वाढदिवसाला दुलकरने एक रोमॅन्टिक पोस्ट शेअर केली आहे. माझ्या प्रिय AMला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आपण तुझा वाढदिवस कित्येकदा शेअर केला आहे. पण काळ जणू थांबला आहे. मी म्हातारा होतोय. मात्र तू आजही जशीच्या तशी आहेस, असं त्याने लिहिलं आहे.
मी नेहमी दूर असतो. पण एकटीने किल्ला लढवतेस, असंही त्याने लिहिलं आहे. दुलकरची बायको अमाल एखाद्या हिरोईनपेक्षा कमी नाही. दोघांची लव्हस्टोरीही चांगलीच फिल्मी आहे.
दुलकर अमेरिकेवरून शिक्षण पूर्ण करून परतला होता आणि त्याच्यावर लग्न करण्याचा दबाव वाढत होता. त्याच्या कुटुंबाने व मित्रांनी एका मुलीचं स्थळ सुचवलं.
ती दुलकरची स्कूल मेट होती. ती सुद्धा त्याला पाच वर्षे ज्युनिअर. पण तोपर्यंत तरी दुलकरला त्या मुलीत फारसा काही इंटरेस्ट नव्हता.
पण याचदरम्यान असं काही घडलं की, दुलकरने त्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला कारण ठरला एक सुंदर योगायोग.
होय, घरच्यांनी सुचवलेली मुलगी या ना त्या निमित्ताने सतत दुलकर समोर येऊ लागली. तो फिरायला गेली, तिथे ती होती. तो सिनेमा पाहायला गेला आणि तिथेही ती होती. सेम मुलगी, सेम टाईम, सेम शो पाहायला पोहोचलेली पाहून दुलकर हैराण होता.
हा योगायोग नक्कीच नसावा. काहीतरी विधीलिखीत असावं, असं दुलकरला वाटलं आणि त्या मुलीशी लग्न करण्यास काहीही हरकत नाही, असं त्याला वाटलं. ती मुलगी अर्थातच अमाल होती.
एकदिवस त्याने हिंमत केली आणि अमालला कॉफी डेटसाठी विचारलं. मग घरच्यांना सांगितलं. दोघांच्याही कुटुंबाने अर्थातच लग्नाला होकार दिला. त्यामुळे हे लव्ह कम अरेंज असल्याचं दुलकर नेहमी सांगतो.
दुलकर सलमानने सिनेमात येण्याआधीच 2011 साली अमालशी लग्न केलं. 2017 साली दुलकर व अमाल यांच्या घरी कन्यारत्न जन्मलं. दुलकर व अमाल हे मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे.