Photos : मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती, सलमान, संजय दत्त ते रणबीरने घेतलं गणेशाचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 07:15 PM2024-09-16T19:15:47+5:302024-09-16T19:36:32+5:30

मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीने हजेरी लावली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणरायाचे (Ganesh Festival 2024 ) दर्शन घेण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

यावेळी बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानदेखील पोहचला होता. सलमानसोबत त्याची बहीण अर्पिता खानही पोहोचली.

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेताना संजय दत्त दिसून आला.

सलमान खान, संजय दत्त यांच्यासोबतच अभिनेता रणबीर कपूरदेखील मुख्यंत्र्यांच्या घरी पोहचला होता.

लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती केली.

अभिनेता आर माधवन यानेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुंबईतील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेतलं.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाची आरती करुन दर्शन घेतलं.

जॅकी भगनानी, शरद केळकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

एवढंच नाही तर लोकप्रिय दिग्दर्शक राजकुमार हिरानीदेखील मुख्यंत्र्यांच्या घरी पोहचले होते. सध्या सर्वच सेलिब्रिटींचे (Bollywood Actor) दर्शन घेतानाचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.