रिया चक्रवर्तीच्या आधी या अभिनेत्रींनीदेखील भोगलाय तुरूंगवास, जाणून घ्या कोण आहेत या अभिनेत्री By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:33 PM 2020-09-15T15:33:41+5:30 2020-09-15T15:56:18+5:30
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केली आहे. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सध्या भायखळा तुरूंगात कैद आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केली आहे. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
रिया ही बॉलिवूडची ही पहिली अभिनेत्री नाही जी तुरूंगाची हवा खाऊन आली आहे. यापूर्वीदेखील काही अभिनेत्रींनी वेगळ्या कारणांसाठी तुरूंगात कैद झाल्या होत्या. जाणून घ्या या अभिनेत्रींबद्दल
मोनिका बेदी बऱ्याच चित्रपटात झळकली आहे. ती अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमची गर्लफ्रेंड होती. मोनिकाला २००२ साली गँगस्टर अबू सालेमसोबत लिस्बन शहरातून अटक करण्यात आली होती.
२० सप्टेंबर, २००२ साली मोनिका आणि अबू सालेमला इंटरपोलने पोर्तुगलमध्ये अटक केले होते. त्यानंतर बनावट कागदपत्रांच्या आधारावर पोर्तुगलमध्ये घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली त्यांना तुरूंगात जावे लागले. मोनिकाला चार वर्षांची शिक्षा झाली. २०१४ साली तिची सुटका झाली होती.
पॅडमॅन, टॉयलेट एक प्रेमकथा, रुस्तम या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या प्रेरणा अरोरा हिने देखील तुरूंगाची हवा खाल्ली आहे. प्रेरणावर कोटींच्या रुपयांची फसवणून केल्याचा आरोप केला होता आणि त्यासाठी तिला अटक झाली होती. प्रेरणा जवळपास ८ महिने तुरूंगात कैद होती.
पायल रोहतागीला नेहरू-गांधी कुटुंबाविरोधात सोशल मीडियावर अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे अहमदाबादमध्ये अटक करण्यात आली होती. काही दिवसानंतर जामिनावर तिची सुटका झाली होती.
मकडी व इक्बाल या सारख्या सिनेमात काम करून दोनदा राष्ट्रीय पुरस्कार जिंकलेली अभिनेत्री श्वेता बासू प्रसाद हिच्या चाहत्यांना तेव्हा झटका लागला होता जेव्हा तिचे नाव वेश्या व्यवसायात समोर आले होते.
एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करताना तिला रंगेहाथ पकडले होते. ज्यानंतर पोलिसांनी तिला रेस्क्यू होममध्ये पाठवले होते. तिथे राहिल्यानंतर श्वेताला क्लीन चीट मिळाली होती.
ममता कुलकर्णीला ५ टम मैंड्रेक्स ड्रगच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते.