काय, फातिमा सना शेख व सान्या मल्होत्रा एकमेकींना करताहेत डेट? काय म्हणाली ‘दंगल गर्ल’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 16:17 IST2020-06-19T16:08:11+5:302020-06-19T16:17:53+5:30
बॉलिवूडच्या ‘दंगल गर्ल्स’ फातिमा सना शेख व सान्या मल्होत्रा या दोघी एकमेकींना डेट करत असल्याची चर्चा सुरु झाली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

मीडियात गेल्या काही दिवसांपासून सान्या व फातिमा दोघी एकमेकींना डेट करत असल्याची चर्चा आहे.
सान्या व फातिमाने आमिर खानच्या ‘दंगल’मध्ये एकत्र काम केले होते.
अफेअरच्या चर्चांचा बाजार गरम असताना आता फातिमाने याबद्दल खुलासा केला आहे.
सान्या व माझे अफेअर सुरु आहे, हे ऐकून मला प्रचंड हसायला आले. आम्ही दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत, कदाचित म्हणून मीडियाने आमचे नाव जोडले,असे फातिमा म्हणाली.
सान्या व मी आम्ही एकमेकींपेक्षा खूप वेगळ्या आहोत. सान्याला स्वच्छता खूप आवडते. आमचा धर्मही वेगवेगळा आहे. धार्मिक पार्श्वभूमी वेगळी असल्याने आम्ही खूप वेगवेगळे आहोत, असे ती म्हणाली.
सान्याने मला खूप काही शिकवले. ती आणि मी धर्मनिरपेक्ष भारताच्या पोस्टर्स गर्ल्सप्रमाणे आहोत. आमची मैत्री खूप पक्की आहे, असेही तिने सांगितले.
याआधी फातिमाचे नाव आमिर खानसोबत जोडले गेले होते.
आमिर व फातिमाच्या वाढत्या जवळीकीमुळे आमिरची पत्नी किरण नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. अर्थात पुढे या सगळ्या अफवा निघाल्या.
सान्या व फातिमाने पहिल्याच सिनेमात एकत्र काम केले होते. यानंतर दोघीअनेक वेगवेगळ्यात सिनेमात दिसल्या.