Fighter : मुख्य भूमिकेत असूनही दीपिकाला हृतिकपेक्षा कमी मानधन, 'फायटर'साठी कोणी किती पैसे घेतले?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:24 PM2024-01-25T13:24:46+5:302024-01-25T13:37:36+5:30

'फायटर' सिनेमासाठी हृतिकने घेतले 'इतके' कोटी, जाणून घ्या इतर कलाकारांच्या मानधनाचा आकडा

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत असलेला 'फायटर' हा बिग बजेट सिनेमा २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. 'पठाण' आणि 'वॉर'चे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा देशभक्तीवर आधारित आहे.

२५० कोटींचं बजेट असलेल्या 'फायटर' सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही प्रेक्षकांकडून पसंती मिळाली होती.

गेल्या कित्येक दिवसांपासून 'फायटर' सिनेमाची चर्चा होती. आता या सिनेमासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचा आकडाही समोर आला आहे.

'फायटर' सिनेमात बॉलिवूड अभिनेता करण सिंग ग्रोव्हरनेही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमात तो स्कॉर्डन लीडर सरताज गिलच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने २ कोटी रुपये मानधन घेतलं आहे.

अनिल कपूर यांनी 'फायटर' सिनेमासाठी खूप मेहनत घेतली होती. भूमिकेत फिट बसण्यासाठी त्यांनी वजनही कमी केलं होतं.

'फायटर'मधील दमदार भूमिका साकारण्यासाठी त्यांनी ७ कोटी रुपये घेतल्याची माहिती आहे.

या सिनेमातील दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडली आहे. पण, मुख्य भूमिकेत असूनही दोघांच्या मानधनात बराच फरक आहे.

'फायटर'साठी सर्वाधिक मानधन हृतिक रोशनने घेतल्याची चर्चा आहे. हृतिकने या सिनेमासाठी तब्बल ५० कोटींचं मानधन घेतलं आहे.

तर दीपिकाला हृतिकच्या मानधनापेक्षा अर्धीही रक्कम मिळालेली नाही. 'फायटर' सिनेमासाठी दीपिकाला १५ कोटींचं मानधन मिळालं असल्याची चर्चा आहे.