'सोल्जर' सिनेमातील जोजो आठवतोय का? अभिनय सोडून करतोय 'हे' काम By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 08:00 AM 2022-08-15T08:00:00+5:30 2022-08-15T08:00:00+5:30
Jeetu verma: जीतूने त्याच्या कारकिर्दीमध्ये बड़े मियां छोटे मियां, बादल, टार्झन: द वंडर कार, बोल बच्चन आणि जय हो या चित्रपटांमध्ये झळकला. तसचं अलिकडे आलेल्या मिर्जापुर 2 या सीरिजमध्येही त्याने काम केलं. बॉबी देओल आणि प्रिती झिंटा यांची मुख्य भूमिका असलेला सोल्जर चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल.
हा चित्रपट १९८८ मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉबी देओलची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला होता.
या चित्रपटात बॉबीसह जोजो ही खलनायकाची भूमिकादेखील विशेष लोकप्रिय झाली होती.
विचित्र हेअरस्टाइल आणि अतरंगी कारनामे यामुळे जोजो विशेष लोकप्रिय झाला.
या चित्रपटात शरत सक्सेना यांच्या मुलाची जोजोची भूमिका अभिनेता जीतू वर्मा यांने साकारली होती.
खलनायकी भूमिकेला विनोदी टच देत जोजोची भूमिका जीतू वर्माने गाजवली. परंतु, आता त्याच्यात कमालीचा बदल झाला आहे.
जीतू वर्मा आता अभिनय क्षेत्रात कार्यरत नसला तरीदेखील कलाविश्वात सक्रीय आहे.
जीतूला घोडेस्वारीचा छंद असून तो याच क्षेत्रात करिअर करत आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये जीतूने कलाकारांना घोडेस्वारी शिकवल्याचंही म्हटलं जातं.
जीतूने त्याच्या कारकिर्दीमध्ये बड़े मियां छोटे मियां, बादल, टार्झन: द वंडर कार, बोल बच्चन आणि जय हो या चित्रपटांमध्ये झळकला. तसचं अलिकडे आलेल्या मिर्जापुर 2 या सीरिजमध्येही त्याने काम केलं.