आलिया-रणबीर पासून अर्जुन-मलायकापर्यंत, आपल्या पार्टनरला या नावाने हाक मारतात हे स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 03:44 PM2022-09-02T15:44:17+5:302022-09-02T15:49:56+5:30

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल्स चाहत्यांना खूप आवडतात. चाहतेही या सेलिब्रिटी जोडप्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जोडपे आपल्या जोडीदारांना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेण्याचा चाहते अनेकदा प्रयत्न करतात. चला तर जाणून घेऊयात याबद्दल...

बॉलिवूड इंडस्ट्रीतील कपल्स चाहत्यांना खूप आवडतात. चाहतेही या सेलिब्रिटी जोडप्यांना फॉलो करतात आणि त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. हे जोडपे आपल्या जोडीदारांना कोणत्या नावाने हाक मारतात, हे जाणून घेण्याचा चाहते अनेकदा प्रयत्न करतात. चला तर जाणून घेऊयात याबद्दल...

बॉलिवूडचे पॉवर कपल रणबीर कपूर आणि आलिया भट सध्या त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. रिपोर्टनुसार, रणबीर कपूर पत्नी आलियाला प्रेमाने 'आलू' म्हणतो.

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही चाहत्यांची सर्वात आवडती जोडी आहे. रिपोर्टनुसार, विराट आपल्या पत्नीला प्रेमाने 'नुष्की' म्हणतो.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहेत. खिलाडी कुमार पत्नी ट्विंकलला 'टीना' म्हणून हाक मारतो.

चाहते निक जोनास आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना पॉवर कपल म्हणून पाहतात. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका पती निकला प्रेमाने 'जान' म्हणते.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांनी २०१२ मध्ये लग्न केले. दोघेही अनेकदा एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ पत्नी करीनाला 'बेबो' म्हणून हाक मारतो.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, जिथे रणवीर पत्नी दीपिकाला प्रेमाने 'छपली' म्हणतो. त्याचवेळी दीपिकाही तिला रणवीरला प्रेमाने 'कॅंडी' म्हणते.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांची लव्हस्टोरी सर्वश्रुत आहे. दोघेही अनेकदा त्यांच्या चाहत्यांना कपल गोल देताना दिसतात. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन कपूर त्याची गर्लफ्रेंड मलायकाला मलायका म्हणणे पसंत करतो. त्याचबरोबर मलायका तिच्या बॉयफ्रेंडला 'मॅड हेटर' म्हणते.