जॅकी श्रॉफपासून ते विकी कौशलपर्यंत, मुंबईच्या चाळीत राहिलेत हे ८ कलाकार, जाणून घ्या कोण आहेत ते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 03:27 PM2024-07-23T15:27:39+5:302024-07-23T15:35:59+5:30

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे भलेही आज कोट्यावधींचे मालक आहेत पण एकेकाळी हेच कलाकार मुंबईतील चाळीत राहत होते. आज त्यांच्याकडे स्वतःचे बंगले आहेत आणि इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे.

बॉलिवूडचे असे अनेक कलाकार आहेत जे भलेही आज कोट्यावधींचे मालक आहेत पण एकेकाळी हेच कलाकार मुंबईतील चाळीत राहत होते. आज त्यांच्याकडे स्वतःचे बंगले आहेत आणि इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे.

ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांनी आपल्या मेहनतीने आपले इंडस्ट्रीत स्थान निर्माण केले. पण संघर्षाच्या दिवसात सुनील दत्त चाळीत राहत होते. पण नर्गिस यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी मुंबईत बंगला विकत घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र हे एका ज्वेलरी शॉपच्या मालकाचा मुलगा असले तरी त्याने त्याच्या बालपणीची काही वर्षे गिरगावमधील श्याम सदन चाळमध्ये व्यतित केली.

ज्येष्ठ बॉलिवूड कॉमेडियन जॉनी लिव्हर हे देखील मुंबईच्या किंग सर्कलमध्ये राहत होते. त्यांनी खूप मेहनत केली आणि नंतर ते इंडस्ट्रीचे आवडते कॉमेडियन बनले.

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अर्शद वारसीही सुरुवातीला चाळीत राहत होता. संघर्षाच्या दिवसांत त्याने बराच वेळ घालवला आणि आज तो मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहतो.

हिंदी चित्रपटसृष्टीतील जॉली अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदा यांचे बालपणही मुंबईतील चाळीत गेले. हे खुद्द गोविंदा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

जॅकी श्रॉफ यांनी ८०च्या दशकात अनेक चित्रपट केले. देव आनंद यांनी आधी त्याची दखल घेतली आणि नंतर त्यांना आपल्या चित्रपटात संधी दिली. जॅकी श्रॉफ यांनी चाळीत सुमारे ३३ वर्षे घालवली आणि त्यांचा बराचसा वेळ तिथेच घालवला.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते की, संघर्षाच्या दिवसांमध्ये ते चाळीत राहत असत. नंतर ते मित्रासोबत फ्लॅटमध्ये राहू लागले. जेव्हा ते यशस्वी झाले तेव्हा त्यांनी स्वतःचा फ्लॅट विकत घेतला आणि आज त्यांच्याकडे चांगली मालमत्ता आहे.

विकी कौशलने 'द कपिल शर्मा शो'मध्ये सांगितले होते की, तो किशोरवयीन होईपर्यंत एका चाळीत राहत होता. त्याचे वडील, ॲक्शन डायरेक्टर शाम कौशल यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते, पण विकीने सांगितले होते की, त्यावेळी ॲक्शन डायरेक्टरला घर चालवण्याइतकेच पैसे मिळायचे. त्यांनी विकी आणि सनीला शिकवले आणि नंतर स्वतःचे घर विकत घेतले.