RRR: श्रद्धा होती बिझी तर परिणीतीचा पत्ता झाला कट, या ७ अभिनेत्रींच्या हातून गेला राजामौलींचा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 04:20 PM2022-03-30T16:20:41+5:302022-03-30T16:28:10+5:30

Bollywood : आता RRR च्या इतक्या यशानंतर त्या कलाकारांना नक्कीच पश्चाताप होत असेल ज्यांनी या सिनेमाचा भाग होण्यास नकार दिला. यात साधीसुधी नाही तर अनेक मोठी नावं आहेत.

एस एस राजामौली यांच्या RRR ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. राम चरण (Ram Charan), ज्यूनिअर एनटीआर (Jr NTR), अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या भूमिका असलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. आता इतक्या यशानंतर त्या कलाकारांना नक्कीच पश्चाताप होत असेल ज्यांनी या सिनेमाचा भाग होण्यास नकार दिला. यात साधीसुधी नाही तर अनेक मोठी नावं आहेत.

इसाबेल कैफ (isabelle kaif) - कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफला Olivia च्या रोलसाठी संपर्क करण्यात आला होता. पण इसाबेलने हा सिनेमा रिजेक्ट केला होता. असं सांगितलं जात आहे की, तिला फिल्मचे डिटेल्स आणि स्क्रिप्ट हवी होती.

परिणीति चोप्रा (parineeti chopra) - परिणीती चोप्राला RRR मध्ये सीतेचा रोल ऑफर करण्यात आला होता. २०१९ मध्ये RRR करणार असल्याच्या बातमीवर तिने प्रतिक्रियाही दिली होती. ती म्हणाली होती की, तुम्ही वाट बघा. घोषणा होऊ द्या. पण नंतर ही भूमिका आलियाला मिळाली.

श्रद्धा कपूर (shraddha kapoor) - रिपोर्ट्सनुसार, श्रद्धा कपूरला सुद्धा RRR मध्ये भूमिका ऑफर झाली होती. पण ती त्यावेळी दुसऱ्या प्रोजेक्टवर काम करत होती. राजामौलींच्या लिस्टमध्ये तिचं नाव सर्वात वर होतं. पण बिझी शेड्युलमुळे तिने नकार दिला.

ऐमी जॅक्सन (amy jackson) - साऊथमधील प्रसिद्ध अभिनेत्री एमी जॅक्सनला Olivia ची भूमिका ऑफर झाली होती. ज्यात ती ज्यूनिअर एनटीआरची प्रेयसी बनली आहे. पण एमी प्रेग्नेंट असल्याने ती ही भूमिका करू शकली नाही.

Daisy Edgar Jones - Daisy ला Olivia च्या भूमिकेसाठी साइन करण्यात आलं होतं. पण तिने स्वत: हा प्रोजेक्ट सोडला. असं सांगितलं जात आहे की, यामागे तिचं पर्सनल कारण होतं. हेही कारण होतं की, सिनेमाच्या शूटिंगला उशीर होत होता. त्यामुळे तिने सिनेमा सोडला.

कीर्ति सुरेश (keerthy suresh) - सिनेमात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका श्रेया सरनने साकारली आहे. रोल छोटासा असूनही तिनं चांगलं काम केलं. असं सांगितलं जातं की आधी ही भूमिका कीर्ती सुरेशला ऑफर झाली होती. पण तिने नकार दिला.

प्रियामणि (priyamani) - मनोज वाजपेयीची वेबसीरीज 'द फॅमिली मॅन'मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रियामणिला अजय देवगणच्या पत्नीची भूमिका ऑफऱ झाली होती. पण तिने ती करण्यात नकार दिला.