समांथापासून ते करिश्मा कपूरपर्यंत, पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर या अभिनेत्री एन्जॉय करतायेत आपलं सिंगल लाईफ By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 04:31 PM 2023-03-28T16:31:32+5:30 2023-03-28T16:41:23+5:30
बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत आणि टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलेलं नाही. त्या आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतायेत. समंथा नागा चैतन्यपासून आधीच वेगळी झाली आहे. विभक्त झाल्यानंतर ती आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतेय. कामातून ब्रेक घेऊन ती अनेकवेळा व्हॅकेशनवर जात असते. (फोटो इन्स्टाग्राम)
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूर आजही सिंगल आहे. ती एकटीच आपल्या दोनही मुलांचा संभाळ करते आणि आयुष्य भरभरुन जगते. (फोटो इन्स्टाग्राम)
श्वेता तिवारीची दोनही लग्न यशस्वी होऊ शकली नाहीत. दोनही लग्न मोडल्यानंत अभिनेत्री आता सिंगल आहे आणि सध्या आपल्या कामावर फोकस करतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
करण सिंग ग्रोवरसोबत घटस्फोट झाल्यानंतर जेनिफर विंगेटने दुसरं लग्न नाही केलं. ती आता आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो इन्स्टाग्राम)
अमृता सिंगने सैफ अली खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर आपल्या दोनही मुलांचा संभाळ सिंगल मदर म्हणून केला. ती आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
रश्मि देसाईचा अभिनेता नंदिश सिंग संधुसोबत २०१६मध्ये घटस्फोट झाला. विभक्त झाल्यानंतर ती सिंगल आहे आणि आपल्या मनानुसार आयुष्य जगतेय. (फोटो इन्स्टाग्राम)
कोमोलिका या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली उर्वशी ढोलकिया सिंगल आहे आणि तिचा मिंगल होण्याचा कोणताच प्लान नाही. (फोटो इन्स्टाग्राम)