'गदर २' ची बक्कळ कमाई, पण ४ कॅरेक्टरला मिस करतायत चाहते By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 11:32 AM 2023-08-16T11:32:04+5:30 2023-08-16T12:22:05+5:30
गदर चित्रपटात अमरिश पुरी यांनी साकारलेला व्हिलन म्हणजे अशरफअली, हे कॅरेक्टर बॉलिवूडमध्ये अजरामर झालं आहे. अमरिश पुरींच्या तुलनेत गदर २ चित्रपटातील व्हिलन तितका भाव खात नाही. सनी देओलचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘गदर २’ हा बॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा हा सीक्वेल आहे.
तब्बल २२ वर्षांनी या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकही आतुर होते. टीझरपासूनच ‘गदर २’ चर्चेत होता. अखेर ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
पहिल्या दिवसापासूनच ‘गदर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. १५ ऑगस्ट रोजी हिंदी चित्रपटांच्या इतिहासात या सिनेमाने नवा विक्रम केला.
१५ ऑगस्ट दिवशी देशातील चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटाने इतकी कमाई केलेली नाही इतकी 'गदर २' ने केली. ५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
गदर २ चित्रपटाला चाहत्यांचा उंदड प्रतिसाद मिळत असला तरी या चित्रपटातून गदर सिनेमातील अनेक कलाकारांना मिस केलं जात आहे. त्यात, विशेष म्हणजे अमरीश पुरी आणि ओम पुरी यांना.
गदर चित्रपटात अमरिश पुरी यांनी साकारलेला व्हिलन म्हणजे अशरफअली हे कॅरेक्टर बॉलिवूडमध्ये अजरामर झालं आहे. अमरिश पुरींच्या तुलनेत गदर २ चित्रपटातील व्हिलन तितका भाव खात नाही.
गदर २ चित्रपटात अशरफ अली यांना पाकिस्तान सरकारने फाशी दिल्याचं दाखवून ते कॅरेक्टर संपवलं आहे. दरम्यान, अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले आहे.
अभिनेता ओम पुरी यांनी गदर चित्रपटात आपला आवाज दिला होता. कथावाचकाच्या रुपाने ते या चित्रपटात होते. मात्र, त्यांच्या दमदार आवाजाची उणीव गदर २ मध्ये जाणवते. येथे त्यांच्याजागी नाना पाटेकर यांचा आवाज घेण्यात आला आहे.
''गदर'' चित्रपटात तारा सिंगच्या जिगरी मित्राची भूमिका विवेक शौक यांनी निभावली होती. गदर २ मध्ये तारासिंगच्या या मित्राचाही उणीव चाहत्यांना भासते. दरम्यान, जानेवारी २०११ मध्ये विवेक शौक यांचं निधन झालं आहे.
अभिनेता मिथिलेश चतुर्वेदी यांनी पाकिस्तानमधील वर्तमानपत्राच्या संपादकाची भूमिका निभावली होती. त्यांचा छोटासा रोलही प्रभावी ठरला होता. दरम्यान, ३ ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांचे निधन झाले.