'गदर 2', सकीना आणि तारा सिंगला केलं मालामाल, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:46 PM2023-01-20T15:46:12+5:302023-01-20T16:03:55+5:30

'गदर २'साठी सनी देओल आणि अमिषा पटेलनं कोट्यवधींचं मानधनं घेतलं आहे.

सनी देओल (Sunny Deol)चा गदर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. देशाच्या फाळणीवर आधारित 'गदर'ची कथा, तारा सिंगचे गाण्यांवरचे प्रेम आणि सकिना यांनी लोकांची मने जिंकली होती. त्यामुळे मुख्य स्टारकास्टमध्ये चित्रपट निर्मात्यांनी कोणताही बदल केलेला नाही. अमीषा पटेल आणि सनी देओल पुन्हा एकदा सकीना आणि तारा सिंगच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि या भूमिकेसाठी दोघांनी निर्मात्यांकडून तगडी फी आकारली आहे. (Photo Instagram)

सनी देओल आणि अमिषा पटेल शिवाय 'गदर 2'ची कल्पना करणं निर्मात्यांना शक्य नव्हते. प्रेक्षक अजूनही त्यांच्यातील ऑनस्क्रीन केमिस्ट्री विसरलेले नाहीत. 'गदर 2'च्या शूटिंगशी संबंधित फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर सनी देओलने पुन्हा एकदा तारा सिंगची भूमिका साकारण्यासाठी ५ कोटी रुपये घेतले आहेत. (Photo instagram)

46 वर्षीय अमिषा पटेल 'गदर 2'मधून पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकिनाच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीने 2 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. (Photo instagram)

सकीना आणि तारा सिंगच्या मुलाच्या 'जीते'च्या भूमिकेत उत्कर्ष शर्मा पुन्हा एकदा दिसणार आहे. 'गदर'मधला तो गोंडस मुलगा आता तरुण झाला आहे. जीतेच्या भूमिकेसाठी त्याने एक कोटीं रुपये घेतले. (Photo instagram)

सिमरत कौरची देखील 'गदर २'मध्ये महत्त्वाची भूमिका आहे, ज्यासाठी मेकर्सनी तिला ८० लाखांचं मानधन दिलं. (Photo Instagram)

लव सिन्हा यांनी 'गदर 2'मध्येही एन्ट्री केली आहे. निर्मात्यांनी त्याला फी म्हणून 60 लाख रुपये दिले आहेत. (Photo Instagram)

अनिल शर्मा 'गदर 2' दिग्दर्शित करत आहेत, जो यावर्षी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'शी टक्कर होणार आहे. (Photo Instagram)