झेंडूच्या फुलांची सजावट, लाकडी देव्हारा; पाहा सोनाली ब्रेंद्रेच्या घरातील बाप्पाची खास झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 04:14 PM2024-09-07T16:14:06+5:302024-09-07T16:20:56+5:30

Sonali Bendre: आज सगळीकडेच चैत्यन्य, मांगल्य घेऊन येणाऱ्या लाडक्या बाप्पाचं आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी अवघे भक्तगण सज्ज झाले आहेत.

सर्वसामान्यांपासून मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळीही बाप्पाच्या भक्कीत तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं आहे.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्याही घरी आज बाप्पा विराजमान झाला आहे.

त्याचे फोटो सोनालीने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने तिच्या घरातील बाप्पाची झलक दाखवली आहे.

लाकडी देव्हारा, शाडूची मुर्ती अन् झेंडूच्या फुलांची सजावट असा देखावा तिने आपल्या घरी केला आहे.

या फोटोंमध्ये पांढरी साडी केसात मोगऱ्याचा गरजा माळून सोनाली बाप्पाची आराधना करताना दिसते आहे.

फोटोंना "Happy Ganesh Chaturthi" असं कॅप्शन देत सोनाली बेंद्रेने चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.