'गॅंग्स ऑफ वासेपुर'च्या अभिनेत्रीचा बदलला आहे लूक, 41 वयातही दिसते इतकी सुंदर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 01:57 PM2023-02-24T13:57:46+5:302023-02-24T14:03:44+5:30

Reema Sen : मनोज वाजपेयीसोबतचे तिचे काही सीन्स खूपच धमाल करून गेले. आज तिचं वय 41 आहे तरीही ती इतकी सुंदर दिसते की, विश्वास बसणार नाही.

Gangs Of Wasseypur Actress Reema Sen Then and Now: रीमा सेनने 'गॅंग्स ऑफ वासेपुर' सिनेमात सरदार खान म्हणजे मनोज वाजपेयीच्या पत्नीचा यादगार भूमिका साकारली होती. या बंगाली अभिनेत्रीचा साडीतील आणि साधा लूक खूप पसंत केला गेला होता. मनोज वाजपेयीसोबतचे तिचे काही सीन्स खूपच धमाल करून गेले. आज तिचं वय 41 आहे तरीही ती इतकी सुंदर दिसते की, विश्वास बसणार नाही.

'गॅंग्स ऑफ वासेपुर' (Gangs Of Wasseypur) सिनेमाची प्रत्येक गोष्ट खास होती. सिनेमातील प्रत्येक भूमिका लोकांच्या मनात घर करून आहे. रीमा सेनचा रोलही खूप खास होता. तिने यात दुर्गाची भूमिका साकारली होती. ती फार बोलली नाही, पण तिचा बोल्ड अंदाज गाजून गेला.

रीमाचा सिनेमातील मनोज वाजपेयीसोबतचा वाद, रोमान्स आणि कॉमेडी यांचे सीन खूप गाजले. रीमाला खूप चांगलं माहीत आहे की, लोकांना कसं आकर्षित करायचं आहे. ती 41 वयातही नव्या हिरोईनसारखी ग्लॅमरस आणि सुंदर दिसते.

रीमा सेनने 11 मार्च 2012 मध्ये बिझनेसमन शिव करण सिंहसोबत लग्न केलं होतं. ती 'गॅंग्स ऑफ वासेपुर' च्या प्रमोशनवेळी दिसली नव्हती. याबाबत तिला विचारलं गेलं तेव्हा ती म्हणाली होती की, 'मी सुट्टीवर होते. त्याच कारणाने सिनेमाची सगळी टीम मला शिव्या देत होती'.

रीमा सेनने 'गॅंग्स ऑफ वासेपुर' च्या शूटदरम्यानचा एक किस्साही सांगितला होता की,'मला सीन शूट करायचा होता. ज्यात मला मनोज वाजपेयीला मारायचं होतं आणि मी चुकून त्याना जोरात मारलं. तेव्हा ते गमतीने म्हणाले होते की, देव तुझ्या पतीची रक्षा करो'.

रीमाने सांगितलं होतं की, तिच्या पतीने 'गॅंग्स ऑफ वासेपुर' सिनेमा पाहिल्यानंतर तिला गुलाबाची फुलं आणि फुगे पाठवले होते. याचा तिला फार आनंद झाला होता.

रीमाने सांगितलं की, मॉडलिंगआधी ती फार लठ्ठ होती आणि कधीही विचार नव्हता केला की, ती मॉडलिंग करेल. रीमा तमिळमधीलही काही हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे.