Gangubai Controversy: 'माझ्या आईला सोशल वर्करवरुन सेक्स वर्कर बनवलं', 'गंगुबाई' सिनेमावर कुटुंबीय भडकले! By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 08:21 PM 2022-02-15T20:21:32+5:30 2022-02-15T20:31:52+5:30
'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पण या चित्रपटामुळे गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबीयांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आपलं राहतं ठिकाण वारंवार बदलावं लागत आहे. 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. पण या चित्रपटामुळे गंगुबाई काठियावाडी यांच्या कुटुंबीयांसमोर अडचणी वाढल्या आहेत. इतकं की कुटुंबीयांना आता मुंबईत वारंवार आपलं राहतं ठिकाण बदलावं लागत आहे. जेणेकरुन लोकांच्या प्रश्नांना सारखं तोंड द्यावं लागणार नाही.
गंगुबाई यांनी चार मुलांना दत्तक घेतलं होतं. पण आज त्यांचं कुटुंब वाढून २० सदस्यांचं झालं आहे. इतक्या वर्षांपासून सर्वसामान्य आयुष्य जगत असलेल्या काठियावाडी कुटुंबाला गंगुबाई सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. इतकंच काय तर त्यांच्या कुटुंबीयांना गंगुबाई यांच्यावर पुस्तक लिहीलं गेलं आहे याचीही कल्पना नाही.
गंगुबाई काठियावाडी यांच्या मुलाला आता अनेकदा विविध टीकांना सामोरं जावं लागत आहे आणि याचमुळे आता त्यांच्या मुलानं कुटुंबीयांच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकत कोर्टाची पायरी चढण्याचा निर्णय घेतला आहे.
गंगुबाईंच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का गंगुबाई काठियावाडी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्यांचे कुटुंबीय मानसिक धक्क्याचा सामना करत आहेत, असं त्यांचे वकील नरेंद्र यांनी सांगितलं. ज्या पद्धतीनं गंगुबाई यांची प्रतिमा दाखवण्यात आली आहे ते पूर्णपणे तथ्यहिन असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेलं पूर्णपणे चुकीचं आणि न्यूड आहे. तुम्ही एका सामाजिक कार्यकर्त्या व्यक्तीची प्रतिमा वैश्यासारखं मोठ्या पडद्यावर दाखवत आहात हे कोणत्या कुटुंबाला आवडेल, असं गंगुबाई यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
ट्रेलरमध्ये तुम्ही गंगुबाई यांना लेडी डॉन आणि माफीया दाखवत आहात. दुसरी गोष्ट म्हणजे एक आपल्या समाजाची एक अडचण अशी आहे की जेव्हा तुमच्या कुटुंबाची इज्जत सर्वांसमोर अशी वेशीवर टांगली जात असते तेव्हा समाज तुमची इज्जत वाचवण्याऐवजी तुमच्याकडेच पुरावे मागू लागतात, असंही गंगुबाई यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही कोर्टात धाव घेतली आहे. पण त्यावर अद्याप कोणतीही सुनावणी होत नाहीय, असंही ते म्हणाले.
माझ्या आईला वैश्या बनवलं गंगुबाई यांनी दत्तक घेतलेल्या बाबुरावजी शाह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गंभीर आरोप केले. 'माझ्या आईला तर यांनी वैश्याच बनवून टाकलं. तिच्याबद्दल आता लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले आहेत. जे मला अजिबात आवडत नाही", असं बाबुरावजी शाह म्हणाले.
गंगुबाई यांची नात भारती म्हणाल्या की, 'चित्रपट निर्मात्यांनी पैशाच्या लालसेपोटी आमच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन केली आहे. अशी अजिबातच अपेक्षा आम्ही केली नव्हती. आमच्याकडे कोणत्याही पद्धतीची परवानगी देखील मागितली गेली नाही. इतकंच काय तर पुस्तक प्रकाशित करतानाही कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती.'
लोकांच्या प्रश्नांनी भंजाळून सोडलं म्हणून घर बदलण्याची वेळ जेव्हा गंगुबाई यांच्या मुलाला कळालं की गंगुबाई यांच्यावर एक पुस्तक आलं आहे तेव्हापासूनच त्यांच्या लढाईला सुरुवात झाली. जेव्हा चित्रपटाच्या प्रोमोसोबत त्यांच्या आईचा फोटो देखील दाखवण्यात आला तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. लोकांनी विविध प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि त्याला कंटाळून कुटुंबीयांवर मुंबईत आपलं राहतं घर वारंवार बदलण्याची नामुष्की ओढावत आहे. आम्ही कधी अंधेरी तर कधी बोरीवली असं वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागत आहे, असं गंगुबाई यांच्या मुलानं सांगितलं.
नातवाईक देखील विविध प्रश्न विचारून त्रास देत आहेत. इतरांनी तर खरंच तुझी आई वैश्या होती का असं विचारण्यास सुरुवात केली आहे. मी तर आधीपासूनच आई समाजसेविका होती असं सांगत आलो होतो. मग आता मला प्रश्न विचारुन माझ्याकडे जणू पुरावेच मागितले जात आहेत, असंही गंगुबाई यांच्या मुलानं सांगितलं.