गौहर खानच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे फोटो तुम्ही पाहिले का? गौहर दिसतेय खूपच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:17 IST2020-12-22T17:17:54+5:302020-12-22T17:17:54+5:30

अभिनेत्री गौहर खान आणि तिचा बॉयफ्रेन्ड जैद दरबार येत्या शुक्रवारी म्हणजे 25 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत.

गौहर आणि जैद यांच्या प्री-वेडिंग सेरेमनी सुरु झाल्या आहेत आणि याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

‘निकाह’च्या आधी सोमवारी चिक्साची विधी करण्यात आली. याचे फोटो आणि गौहरचा डान्स व्हिडीओने इंटरनेटवर धूम केली आहे.

गौहर व जैदने आपल्या लग्नाला ‘गाजा’ असे नाव दिले आहे. हे नाव का, तर वर-वधूच्या नावातील काही अक्षरांना जोडून दिलेले टोपणनाव.

या सेरेमनीमध्ये गौहर आणि जैद दोघेही पिवळ्या रंगाच्या मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसत आहेत. गौहरने गौहरने पिवळ्या रंगाचा लेहंगा तर जैदने पिवळा कुर्ता परिधान केला आहे.

गौहर या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे.