माजी मुख्यमंत्र्यांची सून असलेल्या जेनेलियाच्या नावे आहे इतकी संपत्ती; एकटीचं नेटवर्थ पाहून फिरतील डोळे By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 11:01 AM 2022-08-05T11:01:39+5:30 2022-08-05T11:05:40+5:30
Genelia D'Souza: लग्नानंतर जेनेलियाचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र,सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे. इतंकच नाही तर चित्रपटांव्यतिरिक्त ती अन्य माध्यमातूनही पैसे कमावते. बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची सून जेनेलिया डिसुझा (Genelia DSouza) आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिची चर्चा सुरु आहे.
तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जेनेलियाला खरी ओळख जाने तू या जाने ना या चित्रपटामुळे मिळाली.
जेनेलियाने हिंदीसह तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
जेनेलियाने मॉडेल म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ती रुपेरी पडद्याकडे वळली.
जेनेलियाने २०१२ मध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा लेक आणि अभिनेता रितेश देशमुख याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर जेनेलियाचा कलाविश्वातील वावर कमी झाला. मात्र,सोशल मीडियावर ती चांगलीच अॅक्टीव्ह आहे. इतंकच नाही तर चित्रपटांव्यतिरिक्त ती अन्य माध्यमातूनही पैसे कमावते.
चित्रपट, जाहिराती, ब्रँड प्रमोशनमधून पैसे कमावणाऱ्या जेनेलियाचं एकूण नेटवर्थ किती ते जाणून घेऊयात.
जेनेलिया एका चित्रपटासाठी १ ते २ कोटी रुपये मानधन घेते. तसंच जाहिरातींच्या माध्यमातूनही ती पैसे कमावते.
जेनेलियाने फँटा, , एल.जी मोबाइल, पर्क, मार्गो या ब्रँडसाठी जाहिराती करुन बक्कल पैसे कमावले आहेत.
रिपब्लिक वर्ल्डच्या वृत्तानुसार, एकट्या जेनेलियाची एकूण संपत्ती ४२ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं.
करिअर आणि घर दोघांचा मेळ साधणाऱ्या जेनेलियाला दोन मुलंदेखील आहेत.