द ग्रेट 'खली'चा रोमँटीक डायलॉग, अक्षराने लाजून दिली दाद By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 10:28 PM 2021-12-28T22:28:55+5:30 2021-12-28T22:39:02+5:30
अक्षरा आणि खलीच्या या प्रेमळ जुगलबंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून खलीचे फॅन्स भन्नाट कमेंट करत आहेत. तर, अक्षरावरही बोललं जात आहे. एखाद्या कार्यक्रमाला कुस्तीपटू आणि डब्लूडब्लूईचा द ग्रेट खलीची उपस्थिती म्हणजे चर्चेचा आणि लोकांच्या आवडीचा विषय बनतो. त्यातच, भोजपुरी स्टारसोबत खली झळकल्याने त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सोशल मीडियावर चांगलीच एक्टीव्ह असते. नुकतेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
अक्षराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्टेजवर प्रमुख उपस्थिती असलेल्या खुर्चीत द ग्रेट खली दिसून येतो. तर, बाजुलाच माईक हातात घेऊन लाल रंगाच्या ड्रेसमध्ये अक्षरा भाव खावून जाते.
लाल रंगाच्या पँट, शर्ट आणि काळ्या कोटमध्ये खली खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तर, अक्षरानेही लाल रंगाच्या साडी-ड्रेसमध्ये अंकरींगचा माईक पडकला आहे.
कॅप्शनची गरजच नाही, असे म्हणत अक्षराने व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षरा एक भोजपुरी रोमँटीक डायलॉग बोलताना दिसते. त्यानंतर, हाच डायलॉग खलीने रिपीट केल्याचं पाहायला मिळत आहे.
‘हम रऊआ सबसे बहुत प्यार करीला’ हा डायलॉग अक्षराने म्हटला असून त्यानंतर खलीनेही त्याच्या अंदाजमध्ये तो बोलला. खलीचा अंदाज पाहून अक्षरालाही हसू आवरेना.
अक्षराला हसताना पाहून खलीलालही हसू आले. त्यावेळी, अक्षराने आप कितने प्यारे है... असे म्हणत खलीचं कौतुक करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या अन् शिट्ट्यांनी दाद दिली.
अक्षरा आणि खलीच्या या प्रेमळ जुगलबंदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून खलीचे फॅन्स भन्नाट कमेंट करत आहेत. तर, अक्षरावरही बोललं जात आहे.
अक्षराने भोजपुरी इंडस्ट्रीजची शान वाढवल्याचं फॅन्स सांगत आहेत, तर खलीने भोजपुरी डायलॉग म्हटल्यामुळे त्याचंही कौतुक करत दाद देत आहेत.