जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना' सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज, धाडसी ऑफिसरची प्रेरणादायी कथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 18:35 IST2020-08-01T18:35:57+5:302020-08-01T18:35:57+5:30

जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा गुंजन सक्सेना द कारगिल गर्लचा ट्रेलरचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे.. या चित्रपटाच्या पोस्टरनंतर ट्रेलरबाबत उत्सुकता होती.
गुंजन सक्सेनाचा ट्रेलर दमदार असून हा सिनेमा 12 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल ट्रेलरमध्ये जान्हवी कपूर दमदार दिसते आहे.
जान्हवी भारतीय वायुसेना फ्लाइंग ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.
ट्रेलर पाहिल्यानंतर लक्षात येते की गुंजन सक्सेनाचे जीवन अधोरेखित करण्यात आले आहे.
ट्रेलरमध्ये गुंजन बालपणापासून पायलट बनण्याचे स्वप्न पाहत असते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिचे वडील पूर्ण योगदान देतात
इतकेच नाही तर ट्रेलरमध्ये कारगिल युद्धातील काही झलक पहायला मिळते.