Hansika Motwani : तुम हुस्न परी तुम जाने जहां...हंसिकाचा लेहेंग्यातील सुंदर लूक, दिसतेय लय भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 04:45 PM2024-07-12T16:45:56+5:302024-07-12T16:54:00+5:30

लहान वयात अभिनयाची सुरुवात करणाऱ्या हंसिकाने बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

हंसिका मोटवानी कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सक्रीय असते.

नुकतंच हंसिकाने एक फोटोशुट केलं आहे. याचे फोटो तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

एकापेक्षा एक पोज देतं हंसकानं तिच्या चाहत्यांना घायाळ केलं आहे. लेहेंग्यावर हंसिकानं सुंदर असा नेकलेस परिधान केला आहे.

हंसिकाचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या सौंदर्याची आणि अभिनयाची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा रंगते.

हंसिका छोट्या पडद्यावरील ‘शाकालका बुम बुम’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलेल्या हंसिकाने ‘कोई मिल गया’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं.

त्यानंतर हंसिका अनेक चित्रपटांत झळकली. अभिनयातील करिअरप्रमाणेच ती वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे.

हंसिकाने डिसेंबर २०२२मध्ये बॉयफ्रेंड सोहेल कथुरियाबरोबर लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

सोहेल हा तिच्या मैत्रिणीचा नवरा होता. हंसिकाने मैत्रिणीच्या नवऱ्याबरोबरच संसार थाटला. त्यामुळेही हंसिका चर्चेत आली होती.