Natasa Stankovic: सिनेमामंध्ये काम करत नाही तरीही कोट्यवधींची मालकीण! हार्दिकची Ex पत्नी नताशा पैसे कसे कमवते?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:49 AM2024-07-19T10:49:45+5:302024-07-19T10:59:49+5:30

Hardik Pandya Divorce : हार्दिकशी लग्न केल्यानंतर बॉलिवूडमधून झाली गायब, तरीही कोट्यवधींची संपत्ती, नताशा पैसे कसे कमवते?

Hardik Pandya Divorce : गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांना हार्दिक पांड्या आणि नताशा स्टँकोविचने अखेर पूर्णविराम दिला आहे. ४ वर्षांच्या संसारानंतर हार्दिक आणि नताशाने घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे.

घटस्फोट घेतल्यानंतर नताशा लेक अगस्त्यला घेऊन तिच्या मायदेशी परतली आहे. नताशा मुळची सर्बियाची आहे. अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी २०१२ साली ती भारतात आली होती.

नताशाने अनेक जाहिराती आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. जॉनसन अँड जॉनसन या ब्रँडपासून तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करायला सुरुवात केली होती.

'सत्याग्रह' या सिनेमातून नताशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'त्यानंतर 'फुकरे रिटर्न', 'झिरो', 'ढिंशक्याव', 'झुटा कही का', 'फ्रायडे' यांसारख्या सिनेमांमध्ये ती दिसली.

रॅपर बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या गाण्यामध्ये नताशा झळकली होती. या गाण्यामुळे नताशा प्रसिद्धीझोतात आली होती.

नताशा आणि हार्दिकने २०२०मध्ये ल़ॉकडाऊनमध्ये लग्न करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नानंतर काहीच महिन्यांनी तिने अगस्त्यला जन्म दिला.

हार्दिकबरोबर लग्न केल्यानंतर नताशा बॉलिवूडमधून गायब झाली. ती फारशी कुठेच दिसली नाही. तरीदेखील आज नताशाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी आहे.

नताशा एकूण २० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. सिनेमात काम करत नसली तरी नताशा इतर प्रोजेक्ट आणि जाहिरातीतून कोटींची कमाई करते.

तर हार्दिककडे ९१ कोटींची संपत्ती आहे. हार्दिक महिन्याला १.५ कोटींची कमाई करतो. तर बीसीसीआयकडून त्याला वर्षाला ५ कोटी रुपये मानधन मिळतं.