Hardik Pandya-Natasha Stankovic Divorce : घटस्फोटानंतर नताशाने शेअर केले फोटो, हार्दिक पांड्याच्या कमेंटने वेधलं लक्ष; काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 09:33 AM2024-07-25T09:33:01+5:302024-07-25T09:53:24+5:30

क्रिकेटर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टँकोव्हिच (Natasha Stankovic) यांचा घटस्फोट झाला आहे. चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले.

घटस्फोटच्या निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा सोशल मीडियावर कायम चर्चेत आहेत.

नताशा सध्या सर्बियामध्ये आहे. घटस्फोटाची घोषणा करण्यापुर्वी ती मुंबईहून सर्बियाला तिच्या घरी रवाना झाली होती. त्यानंतरच तिने आणि हार्दिकने घटस्फोटाची घोषणा केली.

यातच आता नताशाने तिच्या इंस्टाग्रामवर मुलगा अगस्त्यसोबतच्या आउटिंगचे काही सुंदर फोटो रेड हार्ट इमोजीसह शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये नताशा तिच्या मुलासोबत डायनासोर थीम पार्कमध्ये एन्जॉय करताना दिसून येत आहे.

या फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे हार्दिक पांड्याच्या कमेंटनं. नताशाने शेअर केलेल्या या फोटोंवर हार्दिकने दोन कमेंट केल्या आहेत.

हार्दिकने पहिल्या कमेंटमध्ये हार्ट इमोजी पोस्ट केलंय. तर दुसऱ्या कमेंटमध्ये त्याने 'वाह' दर्शवणारे एमोजी शेअर केले आहेत.

हार्दिकसोबत कुणाल पांड्यानेदेखील रेड हार्ट एमोजी कमेंट केली आहे. हार्दिकच्या कमेंटवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नताशा किंवा हार्दिक दोघांपैकी कुणाला अगत्स्यची कस्टडी मिळेल, यावर सध्या चर्चा सुरू आहे. हार्दिक आणि नताशाने त्यांच्या तीन वर्षांच्या अगस्त्यच्या पालकत्वाबाबतही भाष्य केलं आहे. नताशा आणि हार्दिक त्यांचा मुलगा अगस्त्यचे पालन एकत्र करणार आहेत.

दरम्यान, हार्दिक आणि नताशाने ३१ मे २०२० ला लग्नगाठ बांधली होती. तसेच फेब्रुवारी २०२३ मध्ये हिंदू आणि ख्रिश्चन विधींनुसार पुन्हा एकदा लग्न केले होते. मात्र त्यांनतर वर्षभरातच पंड्या कुटुंबात काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर त्यांनी एका इन्स्टा पोस्टद्वारे या बातमीला दुजोरा दिला.