'बजरंगी भाईजान'ची 'मुन्नी' हर्षाली मल्होत्राचे इंस्टाग्रामवर झाले १० लाख फॉलोअर्स, केले जंगी सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 16:44 IST2021-06-01T16:44:46+5:302021-06-01T16:44:46+5:30

नुकतेच बजरंगी भाईजान चित्रपटातील मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्राने नुकतेच काही फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत हर्षाली मल्होत्रा इंस्टाग्रामवर १० लाख फॉलोव्हर्स झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन करताना दिसते आहे.

हर्षाली मल्होत्रा बालकलाकार असून तिने बजरंगी भाईजानमध्ये मुन्नीची भूमिका साकारली होती.

बजरंगी भाईजान चित्रपटात हर्षालीचा एकही डायलॉग नव्हता. मात्र तरीही तिचा अभिनय चाहत्यांना खूप भावला होता.

बजरंगी भाईजान चित्रपटात सलमान खान नंतर हर्षाली मल्होत्राच्या कामाची खूप प्रशंसा झाली होती.

बजरंगी भाईजानमधील शाहिदाच्या भूमिकेसाठी जवळपास १००० मुलींनी ऑडिशन दिले होते, त्यातून हर्षालीची निवड झाली होती.

हर्षालीने टेलिव्हिजनवरून करिअरची सुरूवात केली.

हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे.