ऐश्वर्या राय बच्चनचे Unseen Photos पाहिलेत का?, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 05:05 PM2022-04-08T17:05:46+5:302022-04-08T17:13:59+5:30

Aishwarya Rai Bachchan Unseen Photos: ऐश्वर्या राय बच्चन जेव्हा मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारतात परतली होती तेव्हा तिची चौफेर चर्चा झाली होती. त्या काळात तिच्या सौंदर्याची चर्चा जगभर झाली होती.

१९ नोव्हेंबर, १९९४ ही तारीख ऐश्वर्या रायसाठी खूप महत्त्वाची आहे. ही तारीख आहे जेव्हा तिला मिस वर्ल्डचा किताब मिळाला होता. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

निळ्या डोळ्यांची ऐश्वर्या राय हे विजेतेपद जिंकून भारतात परतली तेव्हा तिची चौफेर चर्चा झाली. त्या काळात तिच्या सौंदर्याची चर्चा जगभर झाली होती. आज आम्ही तुम्हाला त्यावेळचे काही न पाहिलेले फोटो दाखवत आहोत, जे पाहून तुम्ही देखील मंत्रमुग्ध व्हाल.

ऐश्वर्या रायने कॉलेजच्या काळात जाहिरातींमध्ये काम करायला सुरुवात केली होती. तिने लहान वयातच ग्लॅमरच्या दुनियेत प्रवेश केला होता.

मॉडेलिंग करताना तिने मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला आणि १९९४ मध्ये ती मिस वर्ल्ड बनली.

यानंतर ऐश्वर्याला अभिनयाच्या ऑफर्स येऊ लागल्या.

१९९७ मध्ये मणिरत्नमच्या इरुवर या तमिळ चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली.

अभिनेत्रीच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव होते 'और प्यार हो गया'.

तिचा पहिला यशस्वी व्यावसायिक तमीळ चित्रपट जीन्स होता.

ऐश्वर्या राय बच्चन हम दिल दे चुके सनम आणि देवदास चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखली जाते. या दोन्ही चित्रपटातील तिच्या कामाची सर्वत्र खूप प्रशंसा झाली होती.

ऐश्वर्या सध्या सिनेइंडस्ट्रीत फारशी सक्रीय नाही. मात्र आजही तिच्या सौंदर्याची चर्चा होताना दिसते.