वय वर्ष ६३ तरीही सुनील शेट्टींचा कमालीचा फिटनेस तरुणाईला देतोय प्रेरणा! काय आहे तंदुरुस्तीचं रहस्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:35 PM2024-11-19T16:35:32+5:302024-11-19T16:49:33+5:30

सुनील शेट्टींचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हे फोटो पाहून त्यांचे सर्व चाहते थक्क झालेत

सुनील शेट्टी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. कॉमेडी असो वा गंभीर भूमिका सुनील शेट्टीने कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशा भूमिका केल्यात

सुनील शेट्टीचे आज सोशल मीडियावर खास फोटो व्हायरल झालेत. यात सुनील शेट्टी बाथरुममध्ये शॉवरने अंघोळ करताना दिसत असून अण्णाच्या या फोटोंना प्रेक्षकांची पसंती मिळालीय

मी माझं वय धुवून काढतोय, असं सुनील शेट्टीने या फोटोंना कॅप्शन दिलंय. वयाच्या ६३ व्या वर्षी सुनील शेट्टीचा हा कमालीचा फिटनेस सर्वांना थक्क करुन सोडतोय

सुनील शेट्टीच्या या कमालीचं फिटनेसचं रहस्य म्हणजे अभिनेता रात्री ९-१० वाजता झोपतो. त्यानंतर सकाळी ५ किंवा ६ वाजता तो उठतो.

उठल्यानंतर सुनील शेट्टी प्राणायाम आणि योगासनांकडे लक्ष देतो. नंतर ४० - ४५ मिनिटं सुनील शेट्टी व्यायाय करतो.

सुनील शेट्टी त्याच्या आहारात सफेद भात, साखर, ब्रेड हे पदार्थ वर्ज्य करुन फ्रेश पालेभाज्या आणि इतर पदार्थांचा समावेश करतो

सुनील शेट्टी लवकरच हेरा फेरी ३, वेलकम टू जंगल या सिनेमांमध्ये आणि धारावी बँक या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे