साऊथच्या या स्टार्सनी त्यांच्या को-स्टार्ससोबतच केलं लग्न, शूटिंग सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 02:05 PM 2022-02-28T14:05:40+5:30 2022-02-28T14:16:28+5:30
South Celebs Who Married Co-Stars: साऊथ इंडियन सिनेमातील गाण्यांवर तर परदेशातील लोकही रील्स बनवत आहेत. यामुळेच आता फॅन्स साऊथमधील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्या उत्सुक आहेत. South Celebs Who Married Co-Stars: साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्स आता देशभरात लोकप्रियता मिळवत आहेत. प्रेक्षकांवर बॉलिवूडपेक्षा साऊथमधील सिनेमांची क्रेझ जास्त बघायला मिळत आहे. साऊथ इंडियन सिनेमातील गाण्यांवर तर परदेशातील लोकही रील्स बनवत आहेत. यामुळेच आता फॅन्स साऊथमधील त्यांच्या आवडत्या कलाकाराच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्या उत्सुक आहेत.
काही दिवसांपूर्वी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाची चर्चा रंगली होती. तेव्हा त्यांच्या फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, विजयने लवकरच एक ट्विट करून ही केवळ एक अफवा असल्याचं सांगितलं. पण भविष्यात असं झालं तर आश्चर्य वाटायला नको. कारण याआधीही अनेक साऊथ इंडियन स्टार्सनी त्यांच्या को-स्टार्ससोबत लग्नगाठ बांधली.
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर - नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) पती महेश बाबूपेक्षा चार वर्षाने मोठी आहे. पण यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण झाली नाही. दोघांची पहिली भेट २००० साली आलेल्या 'वामसी' या तेलुगू सिनेमाच्या शूटींगवेळी झाली होती. दोघेही आधी एकमेकांचे चांगले मित्र झाले. नंतर ते हळूहळू प्रेमात पडले. चार वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २००५ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना गौतम आणि सितारा नावाची दोन मुलं आहेत.
नागार्जुन आणि अमला - साऊथ सिनेमांचा सुपरस्टार नागार्जुन (Nagarjuna) चं अमला (Amala) सोबत हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न लक्ष्मी दुग्गुबातीसोबत झालं होतं. असं सांगितलं जातं की, दोघांचं लग्न मोडण्याला कारण अमला होती. विवाहित असूनही नागार्जुन अमलाच्या प्रेमात पडला होता. त्यांनी सोबत 'किराई दादा', 'चिन्ना बाबू', 'शिवा', 'प्रेम युद्धम' आणि 'निर्णयम' सारख्या सिनेमात काम केलं. हे दोघे जवळ येत असल्याने नागार्जुन आणि पत्नीन वाद वाढला होता. ज्यानंतर लक्ष्मीने नागार्जुनकडून घटस्फोट घेतला. नंतर अमलासोबत त्याने १९९२ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. ज्याचं नाव अखिल अक्किनेनी आहे.
स्नेहा आणि प्रसन्ना - स्नेहा (Sneha) आणि प्रसन्ना (Prasanna) 'Achamundu Achamundu' च्या शूटींगवेळी जवळ आले होते. पण त्यावेळी दोघांमध्ये मैत्रीशिवाय काही नव्हतं. एक वर्षानंतर त्यांना जाणीव झाली की, ते प्रेमात आहेत. त्यानंतर त्यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. त्यांना एक मुलगा आहे.
आर्या आणि सायेशा - आर्या (Arya) ने आपल्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्याने सायेशासोबत 'गजनीकांत' सिनेमा केला होता. तेव्हा तो तिच्या प्रेमात पडला. त्याला सायेशाची मॅच्युरिटी आवडली होती. अनेक लोकांना वाटतं की, दोघांचं लव्ह मॅरेज झालं आहे. पण हे अरेंज मॅरेज आहे. त्यांनी २०१९ मध्ये लग्न केलं. दोघांमध्ये १६ वर्षांचं अंतर आहे.
अजित कुमार आणि शालिनी अजित कुमार - 'अमरकलम' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अजित कुमार आणि शालिनी जवळ आले होते. दोघांनी कॉलिवूड इंडस्ट्रीतील पॉवर कपल म्हटलं जातं. २००० साली दोघांनी शानदार लग्न केलं. लग्नानंतर शालिनी सिनेमात काम करणं सोडलं. दोघांना एक मुलगी अनुष्का आहे.
सूर्या आणि ज्योतिका - ज्योतिका 'पूवेल्लम केत्तुप्पर' सिनेमात सूर्या (Suriya)सोबत दिसली होती. त्यांची ही पहिलीच भेट होती. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. यादरम्यानच दोघे जवळ आले. भेटणं आणि बोलण्याच सिलसिला वाढला. नंतर २००६ साली दोघांनी लग्न केलं. ज्योतिका आणि सूर्याला दोन मुलं आहेत. ज्यांचं नाव दिया आणि देव आहे.
समांथा अक्किनेनी आणि नागा चैतन्य - समांथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य दोघांनाही वेगळ्या परिचयाची गरज नाही. दोघेही साऊथमधील सुपरस्टार्स आहेत. दोघांची पहिली भेट 'मैया चेसवे' सिनेमाच्या सेटवर झाली होती. दोघे वेगळ्या व्यक्तींसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २०१४ साली दोघांनी पुन्हा एका सिनेमात एकत्र काम केलं. इथून दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण त्यांनी नुकताच घटस्फोट घेतला.