Mr. & Mrs. खिलाडी! खास ट्रेडिशनल लूकमध्ये भेटीला आली युजी-धनश्रीची जोडी, पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:20 PM2024-07-13T22:20:11+5:302024-07-13T23:25:08+5:30

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Couple Traditional Photos: भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल, पत्नी धनश्री वर्मा यांच्या पारंपरिक लूक मधल्या फोटोशूटला फॅन्सची तुफान पसंती

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी सेलिब्रिटी डान्सर धनश्री वर्मा हे एक चर्चेतलं स्टार जोडी

यूट्युब स्टार धनश्री वर्मा हिने आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

धनश्री या ताज्या फोटोशूटमध्ये पारंपरिक पेहरावात अतिशय सुंदर दिसत आहे.

युजवेंद्र चहल यानेही एक वेगळा फोटोशूट केला असून त्यात त्यानेही पारंपरिक पोशाख केला आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांचा खास कपल फोटोशूट सध्या चांगलाच चर्चेत आहे.

धनश्रीने चंदेरी रंगाचा पारंपरिक पोशाख केला असून तिने परिधान केलेला लेहंगा खूपच अप्रतिम आहे.

आपला सिल्वर लेहंगा लूक पूर्ण करण्यासाठी तिने मॅचिंग रंगाची पर्सदेखील हाती घेतली आहे.

युजवेंद्र चहल देखील क्रीम कलरच्या पारंपरिक जोधपुरीमध्ये फार हँडसम दिसतोय.

मिस्टर अँड मिसेस चहल या सेलिब्रिटी कपलने एकमेकांना साजेशी अशी वेषभूषा केली आहे.

धनश्रीने आपल्या पारंपरिक लूकमध्ये हिरव्या खड्यांपासून बनवलेला नेकलेस घातला आहे.

आपल्या सिल्वर लेहंगा लूक च्या फोटोशूटमध्ये धनश्रीने वेगवेगळ्या आणि लाघवी अशा पोज दिल्या आहेत

युजवेंद्र चहलने आपल्या जोधपुरी आऊटफिटला परिपूर्ण करण्यासाठी पायात क्लासिक लेदरचे लोफर्स घातले आहेत.

धनश्रीने आपल्या नेकलेसला मॅचिंग अशा हिरव्या खड्यांच्या इअर रिंग्स घालून स्पेशल हेअसस्टाइल केली आहे.

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या जोडीचे हे ट्रेडिशनल फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.

युजवेंद्र चहलच्या जोधपुरी आऊटफिटवर अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलं आहे.

सर्व फोटो- युजवेंद चहल आणि धनश्री वर्मा इन्स्टाग्राम अकाऊंट