चंदेरी नगरीत डोक्यावर पदर घेऊन दहशत पसवरणारी 'स्त्री' कोण? या अभिनेत्रीने साकारली आहे भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 04:38 PM2024-08-16T16:38:39+5:302024-08-16T16:46:04+5:30

Stree -2 : अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'स्त्री- २' हा बहुप्रतिक्षित चित्रपट काल स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

'स्त्री- २' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमा बघायला प्रेक्षक तुफान गर्दी करत आहेत. सॅकनिल्कच्या अहवालानूसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर ५४.३५ कोटींची कमाई केली.

परंतु, या चित्रपटाप्रमाणे राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या व्यतिरिक्त एका आणखी पात्राची सध्या चर्चा होताना दिसतेय. या सिनेमात राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पुन्हा एकदा धमाल करताना दिसत आहेत.

या चित्रपटात 'स्त्री'ची भूमिका साकारणारा पदरामागचा चेहरा नक्की कोणाचा आहे, त्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आहे.

'स्त्री'च्या पहिल्या भागामध्ये फ्लोरा सैनीने लाल घुंगट म्हणजेच पदर घेतला होता. त्यानंतर सिनेमाच्या दुसऱ्या पार्टमध्ये तिला रिप्लेस करण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार , दुसऱ्या भागात दहशत माजवणाऱ्या अभिनेत्रीचं नाव म्हणजे भूमी राजगोर.

अभिनेत्री भूमी राजगोर ही एक गुजराती अभिनेत्री आहे. भूमीने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

स्टारर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटातही ती झळकली आहे. या चित्रपटात तिने कियाराच्या बहिणीची भूमिका निभावली. त्याच दरम्यान तिने तिच्या या नव्या प्रोजेक्टबद्दल हिंट देखील दिली होती.

भूमी राजगोर अहमदाबाद येथील रहिवासी आहे. तिने याआधी 'हरी ओम हरी', 'फक्त महिलाओ माटे' या गुजराती सिनेमांमध्ये काम केलं आहे