'उरी' फेम रीवा अरोरानं अवघ्या १९ व्या वर्षी मिळवली PhD डिग्री, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 11:12 IST2025-03-09T10:57:19+5:302025-03-09T11:12:15+5:30
फोटो पाहून नेटकरी म्हणाले, "पैसे देऊन खरेदी..."

'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' (Uri: The Surgical Strike) चित्रपट प्रदर्शित होऊन ७ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या चित्रपटात बालकलाकार म्हणून दिसलेली रिवा अरोरा आता मोठी झाली आहे.
रिवाने 'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात विकी कौशलच्या भाचीची भूमिका साकारली होती. आता जर तुम्ही रिवा अरोराला (Riva Arora) पाहिलेत तर तुम्ही तिला अजिबात ओळखू शकणार नाहीत. तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे.
रीवाने अवघ्या १९ व्या वर्षी डॉक्टर झाली आहे. तिन 'डिजिटल एन्फ्लुएन्स व वूमन एम्पॉवरमेंट' या विषयात पीएचडी केली आहे.
रीवाने तिच्या पदवीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये रीवा दीक्षांत समारंभात परिधान केल्या जाणाऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहे. आदिशंकर वैदिक विद्यापीठातून रीवाने ही पीएचडी पदवी मिळवली आहे.
फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, "आता मी डॉ. रीवा अरोरा. हा टप्पा गाठणं म्हणजे एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे आणि मी जे काही मिळवलंय त्याचा मला खूप अभिमान वाटतोय".
रीवानं पुढे लिहिलं, "या काळात मला साथ देणाऱ्या महर्षी केशवानंद आणि सचिन गुप्ता यांची मी खूप आभारी आहे. नवीन आव्हाने, नवीन शिकण्याचा हा प्रवास आणि भविष्यात असलेल्या सर्व शक्यताना समोरे जाण्यासाठी मी सज्ज आहे".
रीवाच्या या पोस्टर काहींनी तिचं अभिनंदन केलंय. तर 'डिग्री पैसे देऊन घेतली का?', 'ही डिग्री कशी मिळाली?' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी रीवाच्या या पोस्टवर करत तिला ट्रोल केलं आहे.
गेल्या काही वर्षांत आपण अनेक बालकलाकारांना मोठ्या पडद्यावर आपला ठसा उमटवताना पाहिलं आहे.
रीवा अरोराने आतापर्यंत अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तसेच काही म्युझिकल व्हिडिओंमध्येही ती दिसली आहे.
भारतातील सर्वात श्रीमंत बालकलाकारांपैकी एक रिवा अरोरा आहे. रिपोर्ट्सनुसार, रिवा अरोराची एकूण संपत्ती ८.२ कोटी रुपये आहे