'मिस इंडिया कॉन्टेस्ट'ची फायनलिस्ट आहे ईशान किशनची रूमर्ड गर्लफ्रेंड, फोटो पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 12:10 IST2025-03-25T11:53:08+5:302025-03-25T12:10:15+5:30
Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia: ईशान किशनच्या रूमर्ड गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

क्रिकेटपटू इशान किशन (Ishan kishan) त्याच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो.
आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात त्याने धुमाकूळ घातला. फक्त ४५ चेंडूत इशान किशनने शतक पूर्ण केलं. सध्या त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
इशान किशनची गर्लफ्रेंडही चर्चेत आली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून इशानचे नाव आदिती हुंडियाशी (Aditi Hundia) जोडलं जातं. दोघांनाही एकत्र पाहण्यात आलं.
आयपीएल २०१९ मध्ये, अदिती एका सामन्यात मुंबई इंडियन्सचा जयजयकार करताना दिसली. तेव्हापासून दोघांची नावं एकमेकांशी जोडली गेली. मात्र, या इशान आणि आदितीने (Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia) यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
आदितीनं २०१७ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत अदिती अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यानंतर २०१८ मध्येअदितीने मिस सुपरनॅशनल इंडियाचा किताब जिंकला होता.
यानंतर अदितीने काही वर्षे मॉडेलिंग केले आहे. यानंतर तिने कपड्यांचा ब्रँड सुरू केला.
आदिती हुंडिया ही मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अदितीला इन्स्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात.
फॅशनच्या बाबतीत अदिती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनाही मागे टाकते. तिची स्टाईल आणि ग्लॅमरस स्टाईल भारीच आहे.
इशान आणि अदिती यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेलं आहे. पण, दोघांनी प्रेमाची जाहीरपणे कबुली दिलेली नाही.