आयरा-नुपूरची रॉयल वेडिंग, जोडप्याच्या ख्रिश्चन लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 18:38 IST2024-01-11T17:53:20+5:302024-01-11T18:38:34+5:30
आमिर खानच्या लाडक्या लेकीनं लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर सध्या चर्चेत आहेत.
मुंबईत ३ जानेवरीला त्यांनी रजिस्टर मॅरेज केले होते.
आता पुन्हा आयरा खान आणि नुपूर हे उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाहबंधनात अडकले आहेत.
यावेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयराने व्हाइट गाऊन घातला होता. मॅचिंग ज्वेलरी आणि मिनिमल मेकअपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती.
नुपूर हा बेज रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता.
आयरा आणि नुपूरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसून आला.
बापलेकीचं नातं हे वेगळचं असतं. आयरा-नुपूरने एकमेकांना अंगठी घालताच आमिरचे डोळे पाणावले.
लाडक्या लेकीला वधूच्या वेषात पाहून आमिर खानही भावूक झाला.
आयरा आणि नुपूरने एकमेकांसोबत रोमँटिक डान्सही केला.
आयरा-नुपूरचं मुंबईत ग्रँड रिसेप्शनही होणार असल्याची माहिती आहे.