'राम तेरी गंगा मैली'मधल्या मंदाकिनीला आता ओळखणं झालंय कठीण? आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 07:00 AM2022-10-14T07:00:00+5:302022-10-14T07:00:00+5:30

Mandakini : १९९५ साली रिलीज झालेल्या 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटातून अभिनेत्री मंदाकिनीला खूप लोकप्रियता मिळाली. आता मंदाकिनीला ओळखणं कठीण झालं आहे.

१९९५ साली रिलीज झालेल्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटातून आजपर्यंत सर्वांच्या स्मरणात राहिलेली अभिनेत्री मंदाकिनी २६ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीत परतली आहे.

दिग्दर्शक राज कपूर यांनी मंदाकिनीवर चित्रित केलेल्या दृश्यांमुळे राम तेरी गंगा मैली हा चित्रपट आजही चर्चेत आहे. त्या काळात मंदाकिनीवर चित्रित केलेली दृश्ये खूपच बोल्ड होती.

आता मंदाकिनीला ओळखणं कठीण झालं आहे.

मंदाकिनीने बॉलिवूडमध्ये पाच-सहा वर्षे काम केले. यानंतर तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले गेले. ती इंडस्ट्रीपासून दूर गेली.

काही वर्षांनी मंदाकिनीने बॉलिवूड सोडलं आणि लग्न करून संसार थाटला.

मंदाकिनीचा लूक आधीपेक्षा आता खूप बदलला आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.

लोक आजही मंदाकिनीच्या सौंदर्याचे फॅन आहेत.

आजही मंदाकिनी ५८ वर्षांची होऊनही ग्रेसफुल आणि फिट दिसते.

मंदाकिनी नुकतीच एका म्युझिक अल्बममधून भेटीला आली आहे.

तसेच तिने नुकतेच इंडियन आयडॉल शोमध्येदेखील हजेरी लावली होती.