हार्दिक पांड्या-अनन्या पांडेमध्ये खरोखरंच काहीतरी शिजतंय? अभिनेत्रीच्या निकटवर्तियाने सांगितलं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 04:49 PM2024-07-24T16:49:30+5:302024-07-24T17:44:50+5:30

अंबानींच्या लग्नात हार्दिक आणि अनन्या यांच्यातील जवळीक चर्चेत होती.

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) ४ वर्षांचा संसार मोडला. नताशासोबत त्याने काही दिवसांपूर्वीच घटस्फोट जाहीर केला. त्यांचा घटस्फोट होणार याची चर्चा आयपीएलपासूनच सुरु होती.

घटस्फोटाच्या चर्चांदरम्यानच अंबानींच्या पार्टीत हार्दिक आणि अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) दोघांमध्ये जवळीक दिसली. लग्नातील फंक्शन्समध्ये हार्दिक आणि अनन्या एकमेकांसोबत बेधुंद होऊन नाचत होते. त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना आवडली आणि लगेच त्यांची जोडी बनवणं सुरु झालं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला.

व्हायरल व्हिडिओनंतर दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो केल्याचंही समोर आलं. यामुळे चर्चांना आणखी जास्त उधाण आलं. आता नुकतंच अनन्याच्या निकटवर्तियाने अभिनेत्रीच्या वतीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

बॉलिवूड लाईफने दिलेल्या बातमीनुसार, अनन्याच्या निकटवर्तियाने स्रष्ट केले की, "अंबानींच्या लग्नात हार्दिक आणि अनन्याने एकमेकांसोबत बराच वेळ घालवला हे खरं आहे. पण अनन्या अशीच मनमोकळ्या स्वभावाची आहे. ती ज्याला भेटते त्याच्याशी फ्रेंडली असते."

"बऱ्याच लोकांसोबत ती खूप लवकर मैत्री करते. आणि अंबानींच्या लग्नात तर सगळेच धमाल करत होते. चांगला वेळ एन्जॉय करत होते. त्यामुळे फक्त या दोघांमध्ये कोणीही रोमँटिक अँगल शोधत असेल तर त्यांना हेच सांगायचं आहे की अनन्या सध्या करिअरवर लक्ष देत आहे."

"तिचे काही चित्रपट आणि ओटीटी प्रोजेक्ट्स रिलीज होणार आहेत. अनन्या आपला सगळा वेळ करिअरवर देत आहे. त्यामुळे अनन्या-हार्दिकच्या अफेअरच्या चर्चा फेक आहेत."

अनन्याच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचं तर ती या वर्षाच्या सुरुवातीला आदित्य रॉय कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र काही महिन्यांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं. याआधी तिने ईशान खट्टरला डेट केले.