'खल्लास गर्ल' इशा कोपीकर अचानक गायब झाली, लग्नानंतर जगतेय असे आयुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 06:00 AM 2020-09-30T06:00:00+5:30 2020-09-30T06:00:00+5:30
काही कलाकार चित्रपटसृष्टीत कधी येतात आणि कधी जातात तेही कळत नाही. काहींना सुरूवातीच्या काळात यश मिळतं, नंतर मात्र ते कुठे जातात हे कळत नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे मराठमोळी मुलगी इशा कोपीकर. इशा कोपीकर. जवळपास दहा वर्षे तिने हिंदी चित्रपटसृष्टीत सहअभिनेत्री म्हणून काम केलं.
पहिल्याच चित्रपटात ह्रतिक रोशनसह तिला फिजा चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
अभिनयासोबतच तिने आयटम नंबरमधूनही रसिकांची मनं जिंकली. तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले खल्लास गाणं इतकं हिट ठरलं की रसिकांनी तिला खल्लास गर्ल असं नाव दिलं.
यानंतर ‘प्यार, इश्क और मोहब्बत’, ‘आमदनी अठन्नी और खर्चा रूपया’, ‘ कंपनी, ‘ ‘काँटे’, ‘दिल का रिश्ता’, ‘कृष्णा कॉटेज’ ‘हॅलो’, ‘एक विवाह ऐसा भी’ अशा चित्रपटात ती झळकली. दक्षिणेकडील तेलुगू, तमिळ, कन्नड चित्रपटातही भूमिका साकारल्या. मात आणि फ्रेंडशिप अनलिमिटेड या मराठी चित्रपटातही ती झळकली.
इंदर कुमारसोबतच्या कथित रिलेशनशिपमुळेही ती चर्चेत राहिली होती. इंदर कुमारने याबाबत खुलासे केले होते. मात्र त्याच्या दारूच्या व्यसनामुळे दोघांचं ब्रेकअप झालं.
यानंतर २००९साली ती हॉटेल व्यावसायिक रोहित उर्फ टिम्मी नारंगसह रेशीमगाठीत अडकली.
मुंबईतील ‘लश रेस्टारंट’ आणि ‘द पॅलॅडियम’ हे त्याच्या मालकीचे आहेत.
इशा आणि टिम्मीची ओळख अभिनेत्री प्रीती झिंटाने करून दिली होती.
इशा आपल्या कुटुंबासोबत सुखी आहे. त्यांच्या आयुष्यात ३ वर्षाची मुलगी रायना आहे.