Photos: जॅकलिन फर्नांडिसचा बोल्ड लूक चर्चेत, ब्लॅक ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 17:53 IST2025-01-05T17:36:22+5:302025-01-05T17:53:22+5:30
जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असते.

श्रीलंकन ब्युटी क्वीन जॅकलीन फर्नांडिस आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून जॅकलिनने तिची ओळख निर्माण केली.
२००६ मध्ये जॅकलिनने मिस श्रीलंका युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. तेव्हापासून ती सौंदर्याची चाहत्यांना भुरळ घालते.
जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्ससाठीही चर्चेत असते.
जॅकलिन सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
जॅकलिनने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहे. ज्यात तिनं बोल्ड पोझ देत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
जॅकलिन ब्लॅक ड्रेसमध्ये एकदमच हॉट आणि तितकीच सुंदर दिसते आहे. जॅकलिनच्या या हॉट अदा चाहत्यांना भावल्या आहेत.
जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
जॅकलिन तिच्या ग्लॅमरस लूक्ससाठी प्रसिद्ध आहे. या फोटोंमधून ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सोनू सूदसोबत 'फतेह' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १० जानेवरी रोजी प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय, ती 'वेलकम टू द जंगल' या सिनेमात दिसणार आहे. तसेच तिच्याकडे 'हाउसफुल ५' सिनेमादेखील आहे.