Pahalgam Terrorist Attack : अक्षय कुमार, सोनू सूद ते अजय देवगण... दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप, नोंदवला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 12:51 IST2025-04-23T12:37:22+5:302025-04-23T12:51:42+5:30

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर (Pahalgam Terrorist Attack) बॉलिवूडच्या स्टार्सनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

काश्मीर खोऱ्यातील पहलगामला 'भारताचं स्वित्झर्लंड' म्हटलं जातं. इथं भारत आणि जगभरातून पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. पण, काल पहलगाम (Pahalgam Terror Attack) बैसरन खौऱ्यात रक्ताचे पाट वाहिलेत. दशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पेक्षा जास्त निष्पाप पर्यटकांचा मृत्यू (Pahalgam Terrorist Attack) झाल्याची माहिती आहे. या भ्याड हल्ल्यावर सेलिब्रिटींनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत.

अभिनेता अक्षय कुमारनं (Akshay Kumar on Pahalgam Terrorist Attack) इंस्टाग्रामवर पोस्ट करून पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. अभिनेत्यानं लिहिलं की, "ही बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे निष्पाप लोकांना मारणं, हे घोर पाप आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करतो".

मनोज मुंतशीर (Manoj Muntashir on Pahalgam Terrorist Attack) यांनी एक्सवरील पोस्ट शेअर करत हल्ल्याचा निषेध नोंदवला. ते म्हणाले, "दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, दहशतवादी हिंदू किंवा मुस्लिम नसतो, तो फक्त एक दहशतवादी असतो. हे देवा, पुढच्या जन्मात मला लांडगा बनव म्हणजे, मी अशा गोष्टी बोलणाऱ्या बुद्धिजीवींचे चेहरे फाडू शकेन".

अभिनेता सोनू सूदनं (Sonu Sood on Pahalgam Terrorist Attack) इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत भ्याड हल्ल्यावर संताप व्यक्त केला. तो म्हणाला, "काश्मीरच्या पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध नोदंवतो. सुसंस्कृत जगात दहशतवादाला स्थान नसावं आणि हे भ्याड कृत्य अस्वीकार्य आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावलेत, त्यांच्याबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, यासाठी मी प्रार्थना करतो", या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्यात.

अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn on Pahalgam Terrorist Attack) यानेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्या निषेध केला. तो म्हणाला, "पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकून खूप दुःख झालं आणि मोठा धक्का बसलाय. या घटनेचे बळी ठरलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय, ते सर्व निर्दोष होते. जे घडलं ते हृदयद्रावक आणि पूर्णपणे अमानवी आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आहेत".

अभिनेता संजय दत्त (Sunjay Dutt on Pahalgam Terrorist Attack) याने ट्वीट करत लिहलं, त्यांनी आपल्या लोकांना निर्घृणपणे मारलंय. हे माफ केले जाऊ शकत नाही, या दहशतवाद्यांना हे माहित असले पाहिजे की आपण गप्प बसणार नाही. आपल्याला त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे. मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंहजी यांना विनंती करतो की, त्यांनी योग्य ती शिक्षा द्यावी, असं त्यान म्हटलं.

अभिनेत्री हिना खान (Hina Khan on Pahalgam Terrorist Attack) हिने दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केलं. इन्स्टाग्राम स्टोरीवर "पहलगाम, का, का का...?", असं तिनं लिहलं.

अभिनेता रणवीर शौरीने (Ranvir Shorey on Pahalgam Terrorist Attack) ट्विट करून सरकारला सवाल केलाय. त्यानं लिहिलं, "महासागर आणि मैत्रीपूर्ण देशांनी वेढलेले अमेरिका मजबूत सीमांचे समर्थन करते. आपली संस्कृती आणि वारसा नष्ट करू इच्छिणाऱ्या देशांमध्ये आपण अडकलो आहोत! आपल्या सीमा कधी मजबूत होतील?".

अभिनेता विवेक ओबेरॉयनं (Vivek Oberoi on Pahalgam Terrorist Attack) पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर दु:ख व्यक्त केलं. तो म्हणाला, "काश्मीरमधील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या ह्रदय पिळवटून टाकलं. हे दु:खाचे सावट आपल्यावर आलंय. या हल्ल्यात ज्यांनी आपलं कुटुंब गमावलं आहे, त्या सर्वांसोबत माझ्या मनापासून संवेदना आणि प्रार्थना आहेत. आता जगाने पूर्वीपेक्षाही अधिक द्वेषाविरुद्ध एकजुटीने एकत्र आले पाहिजे, शांततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत".

अभिनेते रवि किशन (Ravi Kishan on Pahalgam Terrorist Attack) यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं, "त्यांनी राज्याबद्दल विचारलं नाही, त्यांनी भाषेबद्दल विचारलं नाही, त्यांनी जातीबद्दल विचारलं नाही, त्यांनी धर्माबद्दल विचारलं...".