रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीत खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य! बघाअर्पिता मेहताने डिझाईन केलेली सुंदर साडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 01:38 PM2023-11-12T13:38:27+5:302023-11-12T13:42:56+5:30

दिवाळीच्या मुहुर्तावर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नेसलेली साडी लक्षवेधी ठरली. तुम्ही पाहिली का जान्हवीच्या त्या सुंदर साडीची झलक?

जान्हवी कपूर सध्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. स्टायलिश, ट्रेण्डी आणि स्टनिंग अभिनेत्री म्हणून सध्या जान्हवी कपूरकडे पाहिले जात आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे.

बॉलीवूड दिवाळी पार्टीत जान्हवी कपूरच्या लुकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं.

तिनं काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

जान्हवीच्या नव्या फोटोशूटवर देखील नेहमीप्रमाणे तरूणाईकडून मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतोय

रॉयल ब्ल्यू रंगाच्या साडीत जान्हवी अगदी सुंदर दिसत होती. वेस्टर्न गाऊनमध्ये जान्हवी जेवढी हॉट- स्टायलिश दिसते, तेवढीच देखणी- सुंदर ती साडीमध्ये दिसते.

प्रसिद्ध डिझायनर अर्पिता मेहताने ही साडी डिझाइन केली आहे. तर ९५ हजार या साडीची किंमत आहे. तसेच या साडीचं खरं सौंदर्य खुललंय ते साडीवरच्या रॉयल ब्ल्यू रंगाचा डीपनेक स्लीवलेस ब्लाउजमुळे.

जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती ‘बवाल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात ती वरुण धवनबरोबर झळकली होती.

तर जान्हवी कपूर लवकरच 'देवरा' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.